शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 07:33 IST

भाजपने लोकसभा निवडणुकीत हॅटट्रिक साधण्यापूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत येऊन हॅटट्रिक साधली; तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) ३२ पैकी ३१ जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्तेत पुनरागमन केले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या अरुणाचल प्रदेश व सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीचा रविवारी निकाल जाहीर झाला. भाजपने लोकसभा निवडणुकीत हॅटट्रिक साधण्यापूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत येऊन हॅटट्रिक साधली; तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) ३२ पैकी ३१ जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्तेत पुनरागमन केले. २०१९ पर्यंत २५ वर्षे सत्तेत असलेल्या विरोधी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला (एसडीएफ) केवळ एक जागा राखता आली.  पक्षाध्यक्ष पवन कुमार चामलिंग यांना लढवलेल्या दोन्ही मतदारसंघांत पराभव पत्करावा लागला.

अरुणाचलच्या जनतेने विकासाच्या राजकारणाला निर्विवाद जनादेश देत भाजपवर पुन्हा विश्वास दाखवला. मी त्यांचे आभार मानतो. सिक्कीममध्ये एसकेएम व मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांचे विजयाबद्दल अभिनंदन. आगामी काळात सिक्कीमच्या प्रगतीसाठी मी राज्य सरकारसोबत काम करण्यास उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

अजित पवार गटाचे तीन उमेदवार विजयीअरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने ३ जागा जिंकल्या असून १० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. या विजयामुळे अजित पवार गटाचे आता देशातील तीन राज्यांत आमदार असून यात महाराष्ट्र, नागालँड आणि आता अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे निकील कामीन, लिखा सोनी आणि टोकू टाटम हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

फुटबॉल स्टार बायचुंग भुतिया पराभूतभारताचे माजी फुटबॉल कर्णधार आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एसडीएफ) उपाध्यक्ष बायचुंग भुतिया यांचा नामची जिल्ह्यातील बारफुंग विधानसभा मतदारसंघात रविवारी एसकेएमच्या रिक्षल दोर्जी भुतिया यांच्याकडून पराभव झाला. रिक्षल यांना ८,३५८ मते मिळाली तर भुतिया यांना ४,०१२ मते मिळाली.

टॅग्स :sikkimसिक्किमArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश