शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सत्ता टिकवण्यासाठी भाजपाची 29 पक्षांशी आघाडी, मित्रपक्षांसाठी जिंकलेल्या जागांवरही सोडले पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 22:20 IST

2014 साली एकहाती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र आता बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक मित्रपक्षांना सामावून घेण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे या होऊ घातलेल्या महाआघाडीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजपानेही कंबर कसली आहे.  2014 साली एकहाती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्याचे धोरण अवलंबले होते. मात्र आता बदलत्या परिस्थितीचा कानोसा घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक मित्रपक्षांना सामावून घेण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे. तसेच या मित्रपक्षांसाठी आपण जिंकलेल्या जागा सोडण्यापर्यंतचे औदार्य भाजपाकडून दाखवण्यात येत आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये 16 मित्रपक्षांचा समावेश होता. या सर्व पक्षांनी एकत्र येत ती निवडणूक लढवून विजय संपादन केला होता. मात्र त्यावेळी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपाला मित्रपक्षांची तेवढी गरज उरली नव्हती. त्यामुळेच शतप्रतिशत भाजपाचा नारा देत भाजपा नेत्यांनी मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात केली होती. पण गेल्या काही काळात बदललेली राजकीय परिस्थिती, काही राज्यात झालेला पराभव यामुळे मित्रपक्षांशी जुळवून घेण्याची भूमिका भाजपाने स्वीकारली आहे. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अधिकाधिक पक्षांना सामावून घेण्याचा धडाका भाजपाने लावला आहे. सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत छोटे आणि मोठे मिळून 29 पक्ष सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने अगदी मुक्तहस्ते या पक्षांना जागावाटप केले आहे. बिहारपासून सुरुवात करायची झाल्यास बिहारमध्ये जिंकलेल्या 22 जागांपैकी पाच जागा भाजपाने मित्रपक्षांना सोडल्या आहेत. येथे भाजपाची जेडीयू आणि एलजेपी या पक्षांसोबत आघाडी आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये सलग पाच वेळा जिंकलेली गिरिडिह लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाने एजेएसयू या मित्रपक्षाला सोडली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची युतीची गाठ नव्याने बांधण्यात यश मिळवल्यावर भाजपाने आपल्या खात्यातील दोन अधिकच्या जागाही आपल्या या जुन्या मित्रपक्षासाठी सोडल्या होत्या. या जागांमध्ये पालघरच्या जिंकलेल्या जागेचाही समावेश आहे.  दरम्यान, दक्षिणेत तामिळनाडूमध्येही एआयएडीएमकेच्या रूपात भाजपाला मित्रपक्ष मिळाला आहे. तसेच डीएमडीके हा पक्षही या आघाडीत सहभागी झाला आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपावर नाराज असलेल्या मित्रपक्षांची समजूत घालण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. ओमप्रकाश राजभर आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना विविध समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण