नवी दिल्ली : भाजपाच्या एका खासदाराने आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता, असा दावा आम आदमी पार्टीचे (आप) कुमार विश्वास यांनी केला आह़े तथापि, हे प्रकरण मी पुढे वाढवू इच्छित नाही, असे सांगून मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देणारे भाजपा खासदार कोण? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला़
19 ऑगस्टला माङो चांगले मित्र असलेले भाजपाचे एक खासदार त्यांच्या पक्षाच्याच काही नेत्यांसोबत गाङिायाबादेतील माङया घरी मला भेटायला आले होत़े मी भाजपात सामील झाल्यास मला दिल्लीचे मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव त्यांनी माङयासमोर ठेवला़ मी होकार दिल्यास भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांशी भेट घालून देऊ, असेही त्यांनी मला सांगितले होत़े मात्र मी हा प्रस्ताव नाकारला, असे विश्वास म्हणाले. विश्वास यांच्या दाव्यानंतर ‘आप’ने भाजपावर जोरदार टीका केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4कुमार विश्वास यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिल्याचा दावा भाजपाने फेटाळून लावला आह़े
4हा दावा खरा असेल तर कुमार विश्वास यांनी पुरावे द्यावेत़
4अरविंद केजरीवाल यांनीही याआधी असेच निराधार दावे केले होत़े माङया मते, विश्वासही आता या वाटेने निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपाप्रमुख सतीश उपाध्याय यांनी दिली़