शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 15:54 IST

AAP : रविवारी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचे माजी आमदार अनिल झा यांना आपचे सदस्यत्व दिले.

नवी दिल्ली : दिल्लीत आज दोन मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. एकीकडे आम आदमी पार्टीचे (आप) नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाचा राजीनामा दिला, तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार अनिल झा यांनी आपमध्ये प्रवेश केला. रविवारी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचे माजी आमदार अनिल झा यांना आपचे सदस्यत्व दिले. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपचे लोक फक्त मोठं-मोठं बोलतात. त्यांना वाटते की जनता मूर्ख आहे, परंतु जनतेला सर्व काही माहित आहे. आमच्या येण्याने स्वर्ग आला असे नाही, दिल्लीत अजून खूप काम बाकी आहे, ते पूर्ण होईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. याशिवाय, जे काही काम झाले ते गेल्या १० वर्षातच झाले हेही सत्य आहे. याआधी दोन्ही सरकारने कोणतेही काम केले नाही,  असेही ते म्हणाले. 

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत दोन सरकारे आहेत. एक राज्य सरकार आणि एक केंद्र सरकार. दिल्लीच्या संबंधात दोन्ही सरकारांकडे सत्ता आणि संसाधने आहेत. केंद्राकडे प्रचंड अधिकार आहेत. दिल्ली सरकारने १० वर्षात पूर्वांचल समाजासाठी एवढी कामे केली आहेत, पण भाजपवाल्यांनी एक गोष्ट सांगावी की, त्यांनी या समाजासाठी काय केले, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.

दरम्यान, दिल्ली सरकारचे ज्येष्ठ मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांनी आपला सुद्धा रामराम ठोकला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. दिल्लीच्या आतिशी सरकारमध्ये ते परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते. कैलाश गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून लोकांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राजधानीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कैलाश गेहलोत यांचा राजीनामा आपला मोठा धक्का समजला जात आहे.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाdelhiदिल्ली