शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये कोणाला मुख्यमंत्री करायचे, यावरून भाजप संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 06:32 IST

सोनोवाल की हिमंत बिस्वा सर्मा?

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोणाला करायचे, या मुद्द्यावरून भाजप द्विधा मन:स्थितीत आहे. त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सर्वनंद सोनोवाल यांना बाजूला सारून हिमंत बिस्वा सर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात येईल अशी चर्चा होती; पण सोनोवाल यांना दुखावले तर आसाममध्ये भाजपला ते महागात पडू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.

आसाममधील निवडणुकांनंतर भावी मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर भाजपने प्रचारादरम्यानही कधीच दिले नाही. हिमंत बिस्वा सर्मा यांच्या गटाच्या दबावामुळे असे प्रश्न भाजप नेहमीच टाळत आला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत आसाममध्ये एनडीएला मिळालेली मते व जिंकलेल्या जागांचे प्रमाण २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांतील प्रमाणापेक्षा कमी आहे. तसेच २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील कामगिरीही फार नेत्रदीपक नाही. २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत ईशान्य भारतामध्ये सर्वनंद सोनोवाल हे भाजपचे अत्यंत लोकप्रिय नेते होते. तर हिमंत बिस्वा सर्मा हे भाजपचे स्टार प्रचारक व नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक आघाडीचे निमंत्रक होते. सर्वनंद सोनोवाल यांचे महत्त्व कमी करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेल्या हिमंत बिस्वा सर्मा यांना भाजपने विधानसभा निवडणुकांत झुकते माप दिल्याने भाजपचा फार फायदा झालेला नाही, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.सोनोवाल व हिमंत बिस्वा सर्मा या दोन नेत्यांनी आसाममध्ये भाजपचा जनाधार वाढविला आहे, पक्षाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. 

या आठवड्यात देणार अहवालआसाममध्ये आता हिमंत बिस्वा सर्मा यांना उपमुख्यमंत्री करावे व  कालांतराने मुख्यमंत्रिपदी वर्णी लावावी असाही भाजप विचार करत आहे. आसामच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसंदर्भात भाजपचे केंद्रीय निरीक्षक आपला अहवाल पक्षाच्या संसदीय मंडळासमोर ठेवतील.

टॅग्स :AssamआसामElectionनिवडणूकChief Ministerमुख्यमंत्री