शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

Punjab Election 2022 : पंजाबमध्ये भाजपा 65 जागांवर निवडणूक लढवणार; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षाला मिळाल्या 'इतक्या' जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:42 IST

Punjab Election 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाबबाबत एनडीएचे व्हिजन स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाबबाबत एनडीएचे व्हिजन स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, पंजाब हे सीमावर्ती राज्य असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे आणि तेथील सुरक्षेचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. 

ही निवडणूक पंजाबचे भवितव्य ठरवेल, असे जेपी नड्डा म्हणाले. ते म्हणाले की, पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस एनडीएकडून 37 जागा लढवेल आणि 15 जागा सुखदेव सिंग ढिंढसा यांच्या शिरोमणी अकाली दलाला (संयुक्त) देण्यात आल्या आहेत. पंजाबमधील 65 जागांवर भाजपा निवडणूक लढवणार असल्याचे जेपी नड्डा यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पंजाबसोबत विशेष नाते आहे आणि आता राज्याला आर्थिकदृष्ट्या यशस्वी करायचे आहे, त्यासाठी तेथे स्थिर सरकारची गरज आहे. पंजाबमध्ये देशविरोधी कारस्थाने होत आहेत, मात्र ही निवडणूक आगामी पिढ्यांना सुरक्षित ठेवणारी निवडणूक ठरेल. ही निवडणूक आणि पंजाब आमच्यासाठी खूप महत्त्वाची असून पंजाबमध्ये कायमस्वरूपी सरकार आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे जेपी नड्डा म्हणाले. 

पंजाबच्या जनतेने देशासाठी खूप बलिदान दिले आहे, गुरू गोविंद सिंग यांचे बलिदान विसरता येणार नाही, गुरु तेग बहादूर यांचेही बलिदान कधीही विसरता येणार नाही, स्वातंत्र्यलढ्यातील भगतसिंग यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. तसेच, मास्टर तारा सिंह यांनीही देशाला खूप काही दिले आहे, असे जेपी नड्डा यांनी सांगितले. 

पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रविवारी त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची नावे जाहीर केली. पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार आहेत. 22 उमेदवारांपैकी 2 माढा, 3 दोआबा आणि 17 मालवा विभागातून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तसेच, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, उमेदवारांची दुसरी यादी दोन दिवसांत जाहीर केली जाईल. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग पहिल्यांदाच काँग्रेस सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत त्यांची भाजपाशी युती आहे. पक्षाने यावेळी नऊ जाट शीख, चार दलित, तीन ओबीसी, पाच हिंदू आणि एका महिलेला तिकीट दिले आहे.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगBJPभाजपा