शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'या' कारणांमुळे भाजपाने तोडली पीडीपीसोबतची युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:34 IST

ही युती तुटण्यासाठी गेल्या काही दिवसांतील तात्कालिक घडामोडी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.

श्रीनगर: भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपा बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यावेळी राम माधव यांनी राज्यातील गेल्या तीन वर्षांतील अपयशाचे सर्व खापर मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रॅटिक (पीडीपी) पक्षावर फोडले. भाजपाच्या या अनपेक्षित निर्णयाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. मात्र, ही युती तुटण्यासाठी गेल्या काही दिवसांतील तात्कालिक घडामोडी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. केंद्र सरकारकडून रमजानच्या महिन्यात काश्मीरमध्ये शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधातील सर्व कारवाया थांबवण्यात आल्या होत्या. ही मुदत काल संपुष्टात आली आणि लष्कराच्या ऑल आऊट मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, पीडीपीने शस्त्रसंधीची ही मुदत आणखी काही काळ वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपाने या मागणीला केराची टोपली दाखवत लष्कराला काश्मीरमध्ये पुन्हा फ्री हँड दिला होता.याशिवाय, राम माधव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पीडीपीशी युती तोडण्याच्या निर्णयामागील आणखी काही कारणे सांगितली. तीन वर्षात आम्ही पीडीपीसोबत राज्यातील कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही काळापासून काश्मीर खोऱ्यातील कट्टरतवादी घटकांचा प्रभाव आणि अशांतता वाढतच आहे. संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमुळे काश्मीरमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यादृष्टीने पोषक वातावरण राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी सर्वस्वी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती कारणीभूत आहेत, असे आमचे म्हणणे नाही. आम्हाला त्यांच्या हेतुंविषयी कोणतीही शंका नाही. मात्र, काश्मीरमध्ये शांतता राखण्यात त्यांना अपयश येत आहे, हेच वास्तव आहे. राज्याच्या विकासाबाबतही हीच अडचण आहे. भाजपाच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांच्या माध्यमातून ते जम्मू-काश्मीरचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, सरतेशेवटी सर्व अधिकार मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे असल्याने त्यामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे राम माधव यांनी सांगितले.  

टॅग्स :BJP-PDPभाजपा-पीडीपीAmit Shahअमित शाह