शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Video:अविवाहित कार्यकर्त्यांनो काश्मीरात जा अन् गोऱ्या मुलीशी लग्न करा; भाजपा आमदाराचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 10:35 IST

मोदी यांनी आपल्या सगळ्याचं स्वप्न साकार केलं आहे.

मुजफ्फरनगर - नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी यांनी पुन्हा एकदा कलम 370 हटवल्यानंतर विवास्पद प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम सिंह सैनी यांनी सांगितले की, देशातील मुस्लिमांना या निर्णयामुळे आनंद व्हायला हवा कारण आता त्यांना न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींसोबत लग्न करता येणार आहे. इतकचं नाही तर भाजपाच्या अविवाहित युवा नेतेही काश्मीरला जाऊन प्लॉट विकत घेऊ शकतील आणि लग्न करु शकतील असं विधान भाजपा आमदाराने केले आहे. 

मुजफ्फरनगरच्या कार्यक्रमात बोलताना भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी म्हणाले की, मोदी यांनी आपल्या सगळ्याचं स्वप्न साकार केलं आहे. भाजपाचे अविवाहित नेते आहेत त्यांना काश्मीरला जाऊन लग्न करता येईल यात आमची कोणतीही अडचण नाही. भाजपाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनाही काश्मीरच्या गोऱ्या मुलींसोबत लग्न करता येईल असं त्यांनी सांगितले. 

कठौली येथे कलम 370 हटविण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर जल्लोष करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते जमले होते. सैनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. यापूर्वीही सैनी यांनी एका कार्यक्रमात बोलताना ज्यांना भारतात राहायला भीती वाटत असेल अशांना बॉम्बने उडविले पाहिजे तसेच या लोकांनी देश सोडून जायला हवं असं वादग्रस्त विधान केलं होतं. 

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक आणून त्या राज्याला केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केलं. तसेच लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य निर्माण करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात असेल तर लडाखमध्ये विधानसभा अस्तित्वात नसेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सांगण्यात आलं. 

कलम 370 हटविल्यानंतर देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केलं गेलं. मात्र या निर्णयावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.  

टॅग्स :BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370