शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 18:31 IST

Anurag Thakur vs Rahul Gandhi, Drugs: दिल्ली पोलिसांनी ६०२ किलो ड्रग्स पकडून काँग्रेसचा माजी पदाधिकारी तुषार गोयलला घेतलं ताब्यात

Anurag Thakur vs Rahul Gandhi, Drugs:  दिल्ली पोलिसांनी गुरुवारी तब्बल ६०२ किलो ड्रग्ज जप्त केले. त्याची एकूण किंमत ५,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये ५६० किलो कोकेन आणि ४० किलो हायड्रोपोनिक गांजाचा समावेश आहे. भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी अंमली पदार्थ जप्तीप्रकरणी काँग्रेसवर काही प्रश्न उपस्थित केले. दिल्लीतील ५ हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्ती प्रकरणातील आरोपी काँग्रेस पदाधिकारी तुषार गोयलचा हुड्डा कुटुंबाशी काय संबंध आहे?, असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर राहुल गांधींनी आता काँग्रेसमध्येही ड्रग्जचा व्यवसाय सुरू केला आहे का? असा खोचक प्रश्न त्यांनी केला.

दिल्लीत ड्रग्ससंबधी पकडण्यात आलेली ही सर्वात मोठी कन्साइनमेंट आहे. याप्रकरणी छापा टाकत पोलिसांनी किंगपीन तुषार गोयल याच्यासह चौघांना अंमली पदार्थांसह अटक केली. आता यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तुषार गोयल यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याच्या कारणावरून भाजपाने टीका केली आहे. याचबाबत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी तुषार गोयल हा काँग्रेसचा पदाधिकारी आहे. जावई आणि दलालांनंतर आता काँग्रेस ड्रग्ज विक्रेत्यांचेही आश्रयस्थान बनली आहे का?

"आरोपी तुषार गोयल हा हरयाणाच्या माजी मुख्यमंत्री हुड्डांचा निकटवर्तीय'

अनुराग ठाकूर यांनी आरोपी तुषार गोयलचे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री दीपेंद्र हुड्डा यांचे निकटवर्तीय असे वर्णन केले आणि दीपेंद्र हुड्डा आरोपींच्या किती जवळचे आहेत ते सांगावे, असे टोलाही लगावला. "देश अंमली पदार्थमुक्त व्हावा, अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण काँग्रेसचे नेतेच दिल्लीत अंमली पदार्थाचा व्यापार चालवत असताना हे कसे होणार? काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी कोणाशीही हातमिळवणी करू शकते हे यावरून सिद्ध होते. काँग्रेसची इच्छा नाही का? याचे उत्तर राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी द्यावे," असे अनुराग ठाकूर म्हणाले.

"अंमली पदार्थांच्या तस्करीतून काँग्रेसने हरयाणा निवडणुकीत किती पैसा गुंतवला? अंमली पदार्थ पकडल्यावर काँग्रेस वारंवार यामुळेच विरोध करते का? आसामच्या मुख्यमंत्र्यांवर दारुचा साठा पकडून त्यावर बुलडोझर चालवला, त्याचा काँग्रेसने विरोध का केला? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे," असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

दरम्यान, भारतीय युवक काँग्रेसचे म्हणणे आहे की आरोपी तुषार गोयल याची पक्षातून यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली होती. भारतीय युवक काँग्रेसने ड्रग्ज जप्तीबाबत भाजपाने केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. तुषार गोयल यांची पक्षविरोधी कारवायांमुळे १७ ऑक्टोबर २०२२ मध्येच संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याचा दावा संघटनेने केला.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरRahul Gandhiराहुल गांधीDrugsअमली पदार्थdelhiदिल्लीcongressकाँग्रेस