शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

नोटाबंदीवरून देशभर रणकंदन!, भाजपा मंत्र्यांनी केले ठिकठिकाणी समर्थन, विरोधी पक्षांनी घातले श्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 04:48 IST

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना काळा दिवस पाळत, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आदी शहरांत मोर्चे, धरणे, निदर्शने, मेळावे आदींचे आयोजन केले

शीलेश शर्मानवी दिल्ली : नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना काळा दिवस पाळत, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आदी शहरांत मोर्चे, धरणे, निदर्शने, मेळावे आदींचे आयोजन केले आणि आपला विरोध व्यक्त केला. महाराष्ट्रात काँग्रेसने नोटाबंदीचे वर्षश्राद्ध केले आणि अनेक कार्यकर्त्यांनी मुंडनही केले. भाजपाचे मंत्री व मुख्यमंत्री यांनी सर्व शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन यूपीए सरकारच्या काळातील घोटाळ्यांच्या निमित्ताने काँग्रेसवर हल्ला चढवला.भाजपाने काळा पैसाविरोधी दिन साजरा करण्याचे जाहीर केले होते, पण पत्रकार परिषदा वगळता कोणतेही कार्यक्रम घेतले नाहीत. मुंबईत नितीन गडकरी तर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये नोटाबंदीचे समर्थन केले. मंत्र्यांनी काय बोलावे, याचा मसुदाच पंतप्रधान कार्यालयातर्फे तयार करण्यात आला होता की काय, असे मंत्र्याच्या विधानांमुळे जाणवत होते.वर्षपूर्तीला संदेश नाहीनोटाबंदीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज टीव्ही व रेडिओवरून जनतेला संदेश देतील, ही अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. पंतप्रधान कार्यालयाने सकाळी नोटाबंदीसंबंधी एक शॉर्ट फिल्म जारी केली. कर्जावरील व्याजदर घटला, स्थानिक संस्थांचा महसूल वाढला, घरांच्या, तसेच मालमत्तांच्या किमती कमी झाल्या, असा दावा पीएमओने केला. तसेच मोदी यांनी अ‍ॅपद्वारे नोटाबंदीवर जनतेला आपले मत मागितले आहे.३९६ कोटींचाकाळा पैसा उघडसरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर, नोटा बदलीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या ८४ गुन्ह्यांत सीबीआयने ३९६ कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आणला. सीबीआयच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.नोटाबंदी ही शोकांतिका : राहुल गांधीयाउलट काळा दिवस पाळणाºया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीमुळे देशाचे आर्थिक सामर्थ्य कमी झाले, बेरोजगारी वाढली, उद्योग बंद पडले, त्यातून जातीय विद्वेषाचे वातावरण वाढत गेले, अशी टीका केली. नोटाबंदी ही शोकांतिका होती, मोदींच्या अविचारी कृत्यामुळे लाखो लोकांचा रोजगार नष्ट झाला, असा आरोपही त्यांनी केला.लक्षावधी लोकांची झाली फरपटकाँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी नोटाबंदीमुळे लक्षावधी लोकांची फरपट झाली, अशी टीका केली. ते म्हणाले की चलनातील रोख रक्कम कृत्रिमपणे कमी केल्याने बाजारातील मागणी घसरली आणि वाढ घटली. हा निर्णय काळा होता, असेच सिद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला.सर्वच विरोधी पक्ष आंदोलनामध्येयुवक काँग्रेसने नोटाबंदीचा निषेध म्हणून गेल्या वर्षी बँकांपुढे जशा रांगा लागल्या होत्या, तशा रांगा दिल्लीत लावल्या. दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोरही निदर्शने करण्यात आली. काँग्रेसबरोबरच तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनीही नोटाबंदीचा निषेध केला. त्यांच्या पक्षांनी, तसेच भाकप, माकप, सपा, संयुक्त जनता दल (शरद यादव गट), बसपा यांनीही ठिकठिकाणी आंदोलने केली.

टॅग्स :Note Banनोटाबंदी