शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

karnataka election 2018- भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 00:02 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 72 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपानं पहिल्या यादीत कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या येडियुरप्पांच्या नावाचा समावेश केला असून, त्यांना शिकारीपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक झाली होती. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच 2019च्या लोकसभा निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत दलितांमध्ये वाढलेला असंतोष, एनडीएच्या मित्र पक्षांनी सोडलेली साथ या विषयांवरही चर्चा करण्यात आली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांवरही बैठकीत चर्चा झाली. भाजपाच्या या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, कर्नाटकातील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत संभाव्य उमेदवारांवर चर्चा करून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 

 कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 12 मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपानं पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच निवडणुकीच्या निकालादिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८