शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

भाजप व विरोधकांत सोमवारी शक्तीपरीक्षा; लोकलेखा समितीच्या सदस्यत्वासाठी होणार निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 05:13 IST

सत्तारुढ भाजप आणि विरोधी पक्षात राज्यसभेत सोमवारी शक्तीपरीक्षा पहायला मिळणार आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांना भलेही अपयश आले असेल, पण राज्यसभेत भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : सत्तारुढ भाजप आणि विरोधी पक्षात राज्यसभेत सोमवारी शक्तीपरीक्षा पहायला मिळणार आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांना भलेही अपयश आले असेल, पण राज्यसभेत भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही. अशात लोकलेखा समितीच्या सदस्यत्वासाठी निवडणुकीसाठी भाजपने दोघांना रिंगणात उतरविले आहे.राज्यसभेत ५० सदस्य असलेल्या काँग्रेसचा तेलुगू देसमचे सी.एम. रमेश यांना पाठिंबा आहे. राज्यसभेच्या कोट्यातील दोन जागेसाठी होणाऱ्या लोकलेखा समितीच्या सदस्यत्वपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने जनता दल यूनायटेडचे भूपेंद्र यादव व हरवंश यांना उतरविले आहे. २४४ सदस्यीय सभागृहात तेलुगू देसमचे सहा सदस्य आहेत. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, बसपा, द्रमुक, राष्ट्रीय लोकदल आणि अन्य विरोधी पक्षांनी रमेशना पाठिंबा दिला आहे. भाजपकडे शिवसेनेचे ३ सदस्य वगळता १०८ जणांचा पाठिंबा आहे. टीआरएस (६) आणि वायएसआर काँग्रेस (२) यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. ते भाजपसोबत गेले तर, भाजपकडे ११६ जणांचे संख्याबळ होईल. भाजपसाठी हे अत्यंत कठीण काम आहे. रमेश भारदस्त उमेदवार आहेत आणि त्यांना मतदान करण्याच्या सूचना विरोधी पक्षांनी सदस्यांना दिल्या आहेत.या दोन्ही जागा ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून ९ सदस्य असलेल्या बिजू जनता दलाकडे त्यांची नजर आहे. तथापि, पीडीपीचे दोन सदस्य विरोधात मतदान करू शकतात. बीजेडी तटस्थ राहणार की, भाजप उमेदवाराला मतदान करेल हे स्पष्ट नाही. अण्णाद्रमुकचे सभागृहात १३ सदस्य असून आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी अण्णाद्रमुकचे नेते उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचा अपमान केल्याने ते सदस्य नाराज आहेत. पनीरसेल्वम यांना वेळ देऊ नही त्या भेटल्या नव्हत्या. पण अण्णाद्रमुकचे मन वळविण्यात यश येईल, असे भाजपला वाटत आहे.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपा