शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

निवडणुकीपूर्वी भाजपाच्या घटनेत मोठी दुरुस्ती! आता BJP अध्यक्षांची ताकद वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 15:49 IST

BJP National Convention: भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल यांनी पक्षाच्या घटनेत दुरुस्तीचा प्रस्ताव आणला. पाहा काय बदल झाले...

BJP Amendment To The Constitution: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत रविवारी (18 फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात पक्षाच्या घटनेत काही दुरुस्ती करण्यात आली आहे. यानुसार, आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवायचा की कमी करायचा, हे संसदीय मंडळ परिस्थितीनुसार ठरवू शकते. भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल यांनी हा प्रस्ताव आणला होता.

भाजपने घटना दुरुस्ती करुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संसदीय मंडळाची ताकद वाढवली आहे. संसदीय मंडळात नवीन सदस्य आणण्याचा किंवा काढण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले आहेत. मात्र, सभापतींचे निर्णय नंतर संसदीय मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येतील.

भाजप अध्यक्षाची निवड कशी होते?रिपोर्टनुसार, पक्षाध्यक्षाची निवड साधारणपणे संघटनात्मक निवडणुकांद्वारे केली जाते. भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते, ज्यामध्ये राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आणि राज्य परिषदांचे सदस्य असतात. पक्षाच्या घटनेत असेही लिहिले आहे की, निवड समितीमधील कोणतेही वीस सदस्य राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे नाव संयुक्तपणे मांडू शकतात.

हा संयुक्त प्रस्ताव किमान पाच राज्यांमधून आला पाहिजे, जिथे राष्ट्रीय परिषद निवडणुका झाल्या आहेत. पण, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तयारीत पक्ष व्यस्त असताना अंतर्गत निवडणुकांसाठी आखून दिलेल्या प्रक्रियेचे पालन करणे अवघड आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ही दुरुस्ती भविष्यातील अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी केली गेली असावी.

भाजप अध्यक्षांची ताकद वाढली

घटनादुरुस्ती करून पक्षाने अध्यक्षांच्या अधिकारात वाढ केली आहे. तसेच पक्षाचे जुने नियम शिथिल करण्यात आले आहेत. भाजपच्या जुन्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती केवळ दोनदाच भाजपचा पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकते आणि दोन्ही वेळा निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. मात्र, या दुरुस्तीनंतर यात शिथिलता आणण्यात आली आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक