शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

नन बलात्कार प्रकरण : आरोपी बिशपला केरळ हायकोर्टाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 12:06 IST

ननवरील बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला केरळ हायकोर्टाने सशर्त जामीन दिला आहे. बिशप फ्रँको मुलक्कलला केरळमध्ये न जाण्याच्या अटीवर हायकोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे.

केरळ : ननवरील बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला केरळ हायकोर्टाने सशर्त जामीन दिला आहे. बिशप फ्रँको मुलक्कलला केरळमध्ये न जाण्याच्या अटीवर हायकोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे.

2014 ते 2016 या दोन वर्षात ननवर बलात्कार केल्याचा बिशप फ्रँको मुलक्कलवर आरोप आहे. याप्रकरणी गेल्या महिन्यात बिशप फ्रँको मुलक्कलला पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला तीन दिवसांच्या चौकशीनंतर त्याला 21 सप्टेंबरला पोलीसांनी अटक केली होती. काही दिवसांपूर्वी जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळत त्यांची 24 सप्टेंबरला दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने बिशप फ्रँको मुलक्कलला केरळमध्ये न जाण्याच्या आणि पासपोर्ट कोर्टात जमा करण्याच्या अटीवर त्याला जामीन दिला आहे.  

बिशप फ्रँको मुलक्कलची व्हॅटिकनने जालंधरमध्ये नियुक्ती केली होती. केरळच्या अधिकृत दौऱ्यावर असताना ननवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. बिशप फ्रॅंको मुलक्कलला व्हॅटिकनने प्रमुखपदावरुन हटवले आहे. दरम्यान, बिशप फ्रँको मुलक्कलने व्हॅटिकनकडे आपल्याला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांनी पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून काही काळासाठी पदमुक्त करण्याची परवानगी मागितली होती. यामागे त्यांनी खटल्याचा हवाला दिला होता. त्यांनी पत्रात लिहीले होते की, आपल्याविरोधात काही आरोपांची चौकशी सुरु आहे, पोलिसांच्या या चौकशीला सहकार्य देण्यासाठी आपल्याला पदमुक्त करण्यात यावे.  

टॅग्स :KeralaकेरळCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय