शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत आता भाजपा सर्वात मोठा पक्ष, मात्र बहुमतापासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 11:21 IST

राज्यसभेतील काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाचा 65 वर्षांचा इतिहास भाजपाने मोडीत काढला आहे.  भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेत काँग्रेसला संख्याबळामध्ये मागे टाकत राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे.

नवी दिल्ली, दि.4 - राज्यसभेतील काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाचा 65 वर्षांचा इतिहास भाजपाने मोडीत काढला आहे.  भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेत काँग्रेसला संख्याबळामध्ये मागे टाकत राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. राज्यसभेत भाजपाचे एकूण 58 सदस्य आहेत तर काँग्रेसचे 57 सदस्य आहेत.  

मध्य प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेवर निवडून आलेले भाजपाचे खासदार सम्पतिया उइके यांनी गुरुवारी शपथ घेतली. केंद्रीय मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनानंतर या जागेवर निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, उइके यांची बिनविरोध निवड झाली आहे.  नरेंद्र मोदी सरकार मे 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर प्रथमच राज्यसभेत भाजपाचे सर्वाधिक खासदार आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून जरी भाजपा समोर आला असला तरी राज्यसभेत बहुमतापासून बराच पछाडीवर आहे.  दरम्यान, काँग्रेस पक्ष 2018 पर्यंत राज्यसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या स्वरुपातच कायम राहिला असता मात्र काँग्रेसमधील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या सदस्यांची संख्या कमी झाली.  

पुढील आठवड्यात राज्यसभेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील 6 जागा पश्चिम बंगाल तर तीन जागा गुजरातमधील आहेत. या निवडणुकीमुळे भाजपावर फारसा काही परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र गुजरातमधील दोन जागा विजय मिळेल, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर  तिस-या जागेवर भाजपाला काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना जिंकू द्यायचे नाही.  

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या दोन खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र पार्टी केवळ एकाच खासदाराला राज्यसभेवर पाठवू शकते. तर ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं विजय मिळवला आहे त्यावरुन त्यांचा पक्ष 5 जागांवर आरामात जिंकणार हे स्पष्ट असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भाजपाला राज्यसभेत पुढील वर्षी बराच फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशातील 9 पैकी 8 जागांवर भाजपाला विजयाची अपेक्षा आहे कारण भाजपानं काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीतही मोठे यश मिळवले आहे. लोकसभेमध्ये भाजपाचे बहुमत आहे मात्र राज्यसभेत बहुमत नाही. दरम्यान, भाजपा-जेडीयू युतीचा फायदा भाजपा होण्याची शक्यता आहे. कारण जेडीयूचे 10 खासदार राज्यसभेत आहेत.