शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्थापनेआधीच बॅड बँकेवर अब्जावधींचे कुकर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 09:54 IST

सूत्रांनी सांगितले की, बॅड बँक कुकर्जांचा निपटारा करण्यावर भर देणार आहे की, केवळ साठवण केंद्राप्रमाणे सर्व कुकर्जे एकत्र करून साठवून ठेवणार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

ठळक मुद्देसूत्रांनी सांगितले की, बॅड बँक कुकर्जांचा निपटारा करण्यावर भर देणार आहे की, केवळ साठवण केंद्राप्रमाणे सर्व कुकर्जे एकत्र करून साठवून ठेवणार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

नवी दिल्ली : भारतीय बँकांच्या अकार्यरत भांडवलाच्या (एनपीए) समस्येचा निपटारा करण्यासाठी स्थापन करण्यात येत असलेली भारतातील पहिली बॅड बँक जूनअखेरीस कार्यरत होत असून, या बँकेच्या डोक्यावर तब्बल २ लाख कोटी रुपये म्हणजेच २७ अब्ज डॉलरच्या कुकर्जाचा भार राहणार आहे. हा आकडा भारतीय बँकिंग व्यवस्थेतील एकूण एनपीएच्या एक चतुर्थांश आहे.  नियोजित योजनेनुसार, बँकांची तणावाखालील कर्जे बॅड बँकेकडे हस्तांतरित करण्यात येतील. सर्व बँकांची कुकर्जे एकाच छताखाली येणार असल्यामुळे त्यासंबंधीची निर्णय प्रक्रिया गतिमान होईल. 

सूत्रांनी सांगितले की, बॅड बँक कुकर्जांचा निपटारा करण्यावर भर देणार आहे की, केवळ साठवण केंद्राप्रमाणे सर्व कुकर्जे एकत्र करून साठवून ठेवणार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. एडेलवीस ॲसेट रिझोल्यूशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार बन्सल यांनी सांगितले की, एकरकमी स्वच्छतेच्या दृष्टीने बॅड बँक उपयुक्त ठरेल. तथापि, हा कायमस्वरूपी उपाय नव्हे. कुकर्जाच्या समस्येचा निपटारा करण्यासाठी दिवाळखोरीविषयक सुधारणा आवश्यक आहेत. अल्वारेझ अँड मार्शल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल शाह यांनी सांगितले की, भारताच्या दिवाळखोरी सुधारणांची सुरुवात तर चांगली झाली होती. तथापि, आता सुधारणा मंदावल्या आहेत.

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र