रघुनाथ पांडे
नवी दिल्ली, दि. १९ - सध्या भारतात आलेल्या 'मायक्रोसॉफ्ट' या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी अस्सल भारतीय चवीच्या 'दही-मिसळी'चा पुरेपूर आस्वाद घेतला. शुक्रवारी सकाळी बिल गेट्स यांनी पत्नी व २० सचिवांसह भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरींची त्यांच्या १३,३ मूर्ती लेन या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी रंगलेल्या गप्पांसोबत बिल गेट्स यांनी झणझणीत 'दही-मिसळ'ही खाल्ली. विशेष म्हणजे ही मिसळ खुद्द गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी बनवली होती. पोटभर मिसळ खाऊन तृप्त झालेल्या गेट्स यांना गडकरींतर्फे खास 'बांबू' पासून बनवलेली ब्रीफकेस तर गेट्स यांच्या पत्नीला एक सुंदर साडी भेट देण्यात आली
बराच काळ रंगलेल्या गप्पानंतर गेट्स यांनी गडकरींचा निरोप घेतला व ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले.