शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : ...अन् बिल गेट्स यांनी थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणाले, असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 21:10 IST

कोरोनाच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांनाही सहाय्य करत असल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.

नवी दिल्लीः जगभरात कोरोनाचा फैलाव झाला असून, अनेक देश त्याला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. भारतातही मोदी सरकारच्या प्रसंगावधानामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला नाही. विशेष म्हणजे कोरोनाच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांनाही सहाय्य करत असल्यानं त्यांचं कौतुक होत आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी मोदींना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून त्यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. भारताने योग्य वेळी निर्णय घेतलापंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात गेट्स म्हणाले, कोरोनाविरुद्धच्या युद्धात तुम्ही आणि तुमच्या सरकारने वेळेत ज्या प्रकारे महत्त्वाची पावलं उचलली आहेत ती कौतुकास्पद आहेत. कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर भारतानं लागलीच लॉकडाऊन जाहीर केले. याव्यतिरिक्त हॉटस्पॉट साइट्सही ओळखल्या गेल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कोट्यवधी लोकांना प्रशासनाच्या मदतीने होम क्वारंटाइन करण्यात आलं.भारताची आरोग्य व्यवस्था होतेय मजबूतया सर्वांव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे अधिकाधिक चाचण्या घेण्यावर लक्ष केंद्रित केले. आवश्यकतेनुसार संपूर्ण परिसर सील करण्यात आला. तसेच आरोग्य व्यवस्था भारत सातत्यानं मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडून सर्व आवश्यक उपाययोजना वेळेवर केल्या जात आहेत.भारत डिजिटल ताकदीचा करतो योग्य वापर कोरोनाच्या युद्धात भारताने आपल्या डिजिटल शक्तीचा पुरेपूर उपयोग केला आहे आणि मला त्याचा  अधिक आनंद झाला आहे, असे गेट्स यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. आरोग्य सेतू मोबाइल अॅप सरकारने सुरू केले असून, आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने आपण कोरोनाग्रस्त असलेला परिसर किती सुरक्षित आहे हे सहज शोधू शकतो.सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा एकत्रसर्व भारतीयांना पुरेशी सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याबरोबरच तुम्ही एकत्र सार्वजनिक आरोग्य संतुलन राखत आहात. आपल्या नेतृत्वात अशा छान गोष्टी होत असल्याचं पाहून आनंद झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBill Gatesबिल गेटसNarendra Modiनरेंद्र मोदी