शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिजू जनता दलामुळे एनडीएचे ‘हरी’ जिंकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 05:03 IST

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या बहुचर्चित निवडणुकीत बिजू जनता दलाच्या दहा मतांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या बहुचर्चित निवडणुकीत बिजू जनता दलाच्या दहा मतांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला. हरिवंश सिंह यांना १२५ तर विरोधकांचे संयुक्त उमेदवार बी.के. हरिप्रसाद यांना १0५ मते मिळाली. निवडणूक जिंकण्यासाठी ११९ मतांची आवश्यकता होती.या निवडणुकीत काही तांत्रिक कारणांमुळे दोनदा मतदान झाले. पहिल्यांदा हरिवंश सिंहांना ११५ मते मिळाली; तर दुसऱ्यांदा मतदान झाल्यावर त्यांच्या मतांची बेरीज १२५वर गेली. हरिवंश सिंह यांना भाजपा व जद (यू) खेरीज अद्रमुक, शिवसेना, अकाली दल, टीआरएस वबीजेडीने साथ दिली.या निवडणुकीत बीजेडीने किंगमेकरची भूमिका बजावली. याखेरीज काँग्रेसचे ३, समाजवादी ३, तृणमूल १, द्रमुकचे २ सदस्य अनुपस्थित राहिल्याने विरोधकांची मते कमी झाली. वायएसआर काँग्रेसचे २ सदस्य मतदानात तटस्थ राहिले. याखेरीज पीडीपीने व ‘आप’ने हरिप्रसाद यांना मतदान न करता मतदानावरच बहिष्कार टाकला.>चढउतार पाहावेच लागतात - सोनियायूपीए अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, ‘विजयी उमेदवार हरिवंश यांचे अभिनंदन. कधी आम्ही जिंकतो तर कधी आमचा पराभव होतो, राजकारणात असे चढउतार पाहावेच लागतात.’>सभागृह हरी कृपेवर : मोदीपंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हरिवंश मूळचे बलियातले आहेत. आॅगस्ट क्रांतीत बलियाचा मोठा सहभाग होता. निवडणुकीत दोन्ही बाजूला हरी होते. यापुढे हे सभागृह हरी कृपेवरच चालणार आहे.’

टॅग्स :Harivansh Narayan Singhहरिवंश नारायण सिंहRajya Sabhaराज्यसभा