शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 11:46 IST

छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

ठळक मुद्दे छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली आहे.चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

बिजापूर -  छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पामेड परिसरात ही चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या कुआकोंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धनिकरका वन क्षेत्रात गुरुवारी (18 एप्रिल) चकमक झाली होती. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर चकमकी दरम्यान एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता. दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून त्यामध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर वर्गीसचा समावेश होता. वर्गीसवर पाच लाखांचे बक्षिस होते. 

छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा

सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (26 मार्च) चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. बिमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली. कोबरा 201 बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी कमांडोंच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला होता. या गोळीबारात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. या चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले. नक्षलवाद्यांकडून 1 रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आल्या होत्या.

Naxal Encounter : जवानांच्या चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा

झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत पीपल्स लिबरेशन फ्रंटचा (पीएलएफआय) एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. या नक्षलवादी संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई राबवली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास जवानांनी पीएलएफआयच्या नक्षलवाद्याला कंठस्नान घातले होते. 

रांचीचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) ए.बी.होमकर यांनी कारवाईबाबत माहिती दिली होती. होमकर म्हणाले की, रनिया पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये गुरूवारी पहाटेच्या सुमारास चमकम उडाली होती. नक्षलविरोधी मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. दरम्यान, जवानांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठा ताब्यात घेतला होता. 

छत्तीसगडमधील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) सकाळी चकमक झाली होती. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्ड्सच्या जवानांनी ही कामगिरी बजावली होती. याआधी झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी (29 जानेवारी)  चकमक झाली होती. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. 

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी