शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : लालू प्रसाद यादवांच्या जावई-मुलीच्या कंपन्यांवर ईडीचा छापा

By admin | Updated: July 8, 2017 11:36 IST

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या जावई व मुलीच्या कंपन्यांवर ईडीनं छापा मारला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.8 - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासहीत त्यांची मुलगी व जावईदेखील  अडचणीत सापडले आहेत. लालूंची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेशदेखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.  याच पार्श्वभूमीवर ईडीनं मिसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणि कंपन्यांवर छापा मारला आहे. एकूण तीन ठिकाणी छापा मारण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. 

तपास संस्थांच्या चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, मिसा आणि शैलेश यांच्या कंपनीनं एक दिवसात बँकमधून तब्बल 90 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. 
 
आणखी बातम्या वाचा
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रेल्वेमंत्री असताना केलेल्या कथित घोटाळ्यांप्रकरणी त्यांच्यासह यादव कुटुंबीय आणि हॉटेलच्या संचालकांवर सीबीआयने शुक्रवारी गुन्हा दाखल केला. शिवाय लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापेही टाकण्यात आले.
 
सीबीआयच्या कारवाईनंतर शनिवारी ईडीनं त्यांची मुलगी मिसा व जावई शैलेश कुमार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापा मारला. दरम्यान, शुक्रवारी सीबीआयकडून करण्यात आलेल्या कारवाईसोबत याचा काहीही संबंध नसल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण मिसा व शैलेश यांच्या बेहिशेबी संपत्तीसंदर्भातील आहे.  
 
शनिवारी सकाळी ईडीनं मिसा भारती आणि शैलेश यांच्याशी संबंधित तीन ठिकाणांवर छापा मारला. यातील दिल्लीतील इंदिरा गांधी एअरपोर्ट जवळील बिजवासन फार्महाऊसचाही समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिसा व शैलेशवर 8 हजार कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. 
 
ही भाजपाविरुद्ध बोलण्याची शिक्षा
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपा आणि आरएसएसविरुद्ध बोलण्याची ही मला दिलेली शिक्षा आहे. मी कुणाला घाबरत नाही आणि भाजपाविरुद्ध विरोधकांना एकजूट करण्यासाठी काम करीतच राहीन. २७ ऑगस्टची पाटण्यातील रॅली आणखी जोमाने काढणार आहोत. आपल्याविरुद्धची कारवाई राजकीय द्वेषातून केली जात आहे, पण मी मागे हटणार नाही. भाजपा आणि मोदी सरकारला संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. - लालूप्रसाद यादव
 
कुणाविरुद्ध  गुन्हा?
तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव (६९) त्यांच्या पत्नी राबडी देवी, त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता यांच्या पत्नी सरला गुप्ता.
 
सुजाता हॉटेलचे दोन्ही संचालक विजय आणि विनय कोचर, चाणक्य हॉटेल, डिलाइट मार्केटिंग कंपनी (ही कंपनी आता लारा प्रोजेक्ट म्हणून ओळखली जाते.) यांच्या मालकांवर, तत्कालीन आयआरसीटीसीचे मुख्य संचालक पी.के. गोयल.
 
फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
सरकार, भाजपाचा संबंध नाही
या कारवाईशी सरकार वा भाजपाचा काहीही संबंध नाही. सीबीआय आपले काम करीत आहे. यात राजकीय सुडाची भावना कोठे दिसते? यात भाजपा कोठे दिसतो? जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध आरोप असतील, तर त्याची चौकशी केली जाऊ नये, असे वाटते की काय? पूर्वी नव्हते, इतके स्वातंत्र्य आता सीबीआयला आहे. यात हस्तक्षेप नाही. या कारवाईचा बिहारमधील राजद-जदयू आघाडीवर परिणाम होईल का, हे मला माहीत नाही. नितीशकुमार एक बुद्धिवान आणि परिपक्व व्यक्ती आहेत. काय करायचे, हे त्यांना चांगले माहीत आहे. - व्यंकय्या नायडू, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री
 
हे सरकारच्या हातचे बाहुले
सीबीआय, ईडीसारख्या संस्था सरकारच्या हातातील बाहुले झाल्या आहेत. राजकीय विरोधकांविरुद्ध असे कट केले जात आहेत. लोकशाहीत असे प्रकार योग्य नाहीत. हे प्रकरण २००४ मधील आहे, तर गुन्हा २०१७ मध्ये का दाखल केला? भाजपा तीन वर्षे गप्प का होते? - रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्ते