शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी लोकप्रियता पाहून टिकटॉकवर बंदी घातली...!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 19:19 IST

"काही लोकांना वाटते, की राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तिकीट कोट्यवधी रुपये देऊन मिळवले जाऊ शकते आणि निवडणूक लढविली जाऊ शकते. मात्र, त्यांना हे लक्षात असायला हवे, की हा गरीब लोकांचा पक्ष आहे."

पाटणा - बिहारची राजधानी पाटणा येथे विद्यार्थी राजदच्या  कार्यक्रमापूर्वी सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये तेजस्वी यादव यांना स्थान न दिल्यानंतर, रविवारी झालेल्या कार्यक्रमात लालू प्रसादचा मोठा मुलगा तेज प्रताप यांनी त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षाला हिटलर म्हणून संबोधित केले. एवढेच नाही, तर इंटरनेट मिडियावरही ते प्रचंड संतापले आणि बिहारमध्ये इंटरनेट मिडियावरच बंदी घालायला हवी, कारण लोक त्याचा चुकीचा वापर करत आहेत. तसेच, माझी लोकप्रियता पाहूनच नरेंद्र मोदींनी टिकटॉकवर बंदी घातली आहे, असेही माजी आरोग्यमंत्री तेज प्रताप यांनी म्हटले आहे. याच बरोबर, काही लोक माझी चेष्टा करतात, वेळ आल्यावर त्यांनाही उत्तर दिले जाईल, असेही तेज प्रताप म्हणाले.

ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"

विद्यार्थी राजदचे राज्यातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विद्यापीठ आणि विभागीय अध्यक्ष यांच्या एक दिवसीय बैठकीत तेज प्रताप यादव बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिले, की आपल्या कन्हैया जींचे (तेज प्रताप) चाहते टिकटॉकवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. म्हणून त्यांनी त्यावर बंदी घातली. एवढेच नाही, तर अनेक लोक लालू प्रसाद, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांचे फोटो लावून इंटरनेट मीडियाचा गैरवापर करतात, हे योग्य नाही, नाही, असेही ते म्हणाले.

राजद गरीब जनतेचा पक्ष -तेज प्रताप यादव म्हणाले, काही लोकांना वाटते, की राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तिकीट कोट्यवधी रुपये देऊन मिळवले जाऊ शकते आणि निवडणूक लढविली जाऊ शकते. मात्र, त्यांना हे लक्षात असायला हवे, की हा गरीब लोकांचा पक्ष आहे. तसेच, काही लोक इंटरनेट माध्यमांवर माझी चेष्टा करतात. माझ्या विरोधात कट रचतात. मी त्यांना ओळखतो, पण नावे घेणार नाही. पण असा हेतू असलेल्यांच्या स्वप्नांचा मी चुराडा करीन. 

"जीन्सवाल्यांना पक्षात नो एन्ट्री, जीन्स घालणारे काय राजकारण करणार?"; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारTej Pratap Yadavतेज प्रताप यादवPoliticsराजकारण