शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:05 IST

"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला."

जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी समान नागरी संहितेसंदर्भात अथवा युनिफॉर्म सिव्हिल कोडसंदर्भात भाष्य केले आहे. "जोवर देशाच्या लोकसंख्येच्या 20 टक्के असलेल्या मुस्लिम समाजाला विश्वासात घेतले जात नाही, तोवर कायदा बदलता येणार नाही. जसे आपण CAA आणि NRC संदर्भात बघितले की, संपूर्ण देशात निदर्शने झाली होती. जोवर सरकार या कायद्यामुळे प्रभावित होणाऱ्या लोकांना विश्वासात घेत नागी, तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही."

शेतकरी आंदोलनाचा उल्लेख - एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला. यामुळे, त्यांनी यूसीसीसंदर्भात कायदा तयार केला तरी ते तो लागू करू शकणार नाही. लोकशाही व्यवस्थेत, जेव्हा आपण एखादा कायदा तयार करता, तेव्हा त्याचा ज्या समुहांवर अथवा लोकांवर परिणाम होणार आहे, त्या सर्वांन विश्वास घ्यावे, अशी अपेक्षा आपल्याकडून केली जाते."

पंतप्रधान मोदींनीही केले आहे भाष्य -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना समान नागरी संहितेसंदर्भात (यूसीसी) भाष्य केले होते. मोदी म्हणाले होते की, आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाने वारंवार UCC संदर्भात चर्चा केली आहे. अनेक वेळा आदेश दिले आहेत. आपण ज्या नागरी संहितेंतर्गत जगत आहोत ती प्रत्यक्षात एक कम्युनल आणि भेदभाव करणारी आहे, असे देशातील एका मोठ्या वर्गाचे मत आहे.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरUniform Civil Codeसमान नागरी कायदाBJPभाजपाMuslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदी