शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश सर्वात गरीब राज्यं; केरळचा नंबर शेवटचा; महाराष्ट्र कितवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 13:24 IST

केरळची सर्वोत्तम कामगिरी; गरीब लोकसंख्येचं प्रमाण १ टक्क्याहून कमी

नीती आयोगानं पहिल्यांदाच बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला आहे. त्यानुसार बिहार देशात पहिल्या क्रमांकावर आहे. झारखंड दुसऱ्या,  तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. केरळमध्ये सर्वात कमी गरिबी असल्याचं नीती आयोगाचा अहवाल सांगतो. केरळसोबतच गोवा, सिक्कीमध्येही गरिबीचं प्रमाण कमी आहे.

नीती आयोगाच्या अहवालानुसार, बिहारमधील ५१.९१ टक्के लोकसंख्या गरीब आहे. झारखंडमध्ये हेच प्रमाण ४२.१६ टक्के, उत्तर प्रदेशात ३७.७९ टक्के आहे. या यादीत मध्य प्रदेश चौथ्या स्थानी आहे. मध्य प्रदेशातील ३६.६५ टक्के जनता गरीब आहे. मिझोरम पाचव्या क्रमांकावर आहे. तिथली ३२.६७ टक्के लोकसंख्या गरीब आहे. महाराष्ट्राचा क्रमांक १७ वा असून राज्यातील एकूण १४.८५ टक्के जनता गरीब आहे. यानंतर तेलंगणा (१३.७४ टक्के), कर्नाटक (१३.१६ टक्के), आंध्र प्रदेश (१२.३१ टक्के) आणि हरियाणाचा (१२.२८ टक्के) क्रमांक लागतो.

केरळची कामगिरी सर्वोत्तमसर्वोत्तम साक्षरता असलेलं राज्य असलेलं राज्य अशी ओळख असलेल्या केरळनं गरिबी निर्मूलनाच्या बाबतीतही दमदार कामगिरी केली आहे. नीती आयोगाच्या अहवालातील आकडेवारीनुसार केरळमधील केवळ ०.७१ टक्के लोकसंख्या गरीब आहे. गोव्यातील ३.७६ टक्के, तर सिक्कीममधील ३.८२ टक्के लोकसंख्या गरीब आहे. या यादीत तमिळनाडू चौथ्या स्थानी आहे. तमिळनाडूतील ४.८९ टक्के लोकसंख्या गरीब आहे. 

केंद्रशासित राज्यांमध्ये पुद्दुचेरी अव्वलकेंद्रशासित राज्यांचा विचार केल्यास दादरा नगर हवेली सर्वात गरीब आहे. तिथली २७.३६ टक्के लोकसंख्या गरीब आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख (१२.५८ टक्के), दमण आणि दिव (६.८२ टक्के), चंदिगढ (५.९७ टक्के) यांचा क्रमांक लागतो. पुद्दुचेरीतील केवळ १.७२ टक्के लोकसंख्या गरीब आहे. लक्ष्यद्विपमधील १.८२ टक्के आणि अंदमानातील ४.३० टक्के लोकसंख्या गरीब आहे.

टॅग्स :NIti Ayogनिती आयोग