शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 19:23 IST

Bihar Politics: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Bihar Politics: बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांच्या 'जन सूरज' पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली आहे. माजी खासदार उदय सिंग उर्फ ​​पप्पू सिंग यांना पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले आहे. कोअर कमिटीच्या सदस्यांनी एकमताने उदय सिंह यांची निवड केली आहे. नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल, प्रशांत किशोर यांनी जन सूरज परिवाराच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, जन सूरज जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेल.

उदय सिंह यांनी प्रशांत किशोर यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. उदय सिंह यांनी सांगितले की, प्रशांत किशोर हे जन सूरजचे सूत्रधार आहेत. राजकारणातील त्यांच्या दीर्घकाळाच्या सहभागाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या समर्पणाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. प्रशांत किशोर यांच्या बैठकांमध्ये बिहारच्या कल्याणासाठी होणाऱ्या बदलांवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

जन सुराज अभियानाने बिहारमधील लोकांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जन सूरज मोहिमेच्या कल्पनेने लोकांमध्ये आकर्षण निर्माण केले. जनसुरज पक्षाची स्थापना जनतेच्या मागणीवरून करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. 

आरसीपी सिंह जन सूराजमध्ये सामीलनुकतेच माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सेनापती असलेल्या आरसीपी सिंह यांनी जन सूरजमध्ये पक्षप्रवेश केला आहे. आरसीपी सिंह जन सूरजमध्ये सामील झाल्यानंतर बिहारमधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. आता बिहारच्या राजकारणात जनसुरजला तिसरा पर्याय बनवण्याचे आव्हान उदय सिंह यांच्यासमोर असेल.

टॅग्स :BiharबिहारPrashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा