Bihar Politics: बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या (१४ एप्रिल) आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
बैठकांची मालिका
मिळालेल्या माहितीनुसार, राजीनाम्यापूर्वी उद्या दुपारी २ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल, जो पुढील मुख्यमंत्री असेल. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता एनडीए (NDA) विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, ज्यामध्ये नितीश कुमार नव्या मुख्यमंत्रीपदासाठी नाव प्रस्तावित करतील.
राजीनामा अन् सरकार स्थापनेचा दावा
नितीश कुमार राजभवनात जाऊन अधिकृतपणे राजीनामा सादर करतील. त्यानंतर एनडीएच्या नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे सादर केला जाईल. शपथविधी सोहळा पटना येथील लोकभवनात आयोजित करण्यात येणार असून, राज्यपाल कार्यालयाने तयारीला सुरुवात केली आहे.
जेडीयूची अंतर्गत बैठक
दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नव्या सरकारमधील पक्षाची भूमिका आणि उपमुख्यमंत्री पदाविषयी चर्चा झाली. या बैठकीत संजय झा, ललन सिंह, जमा खान आणि बिजेंद्र यादव यांसारखे नेते उपस्थित होते.
Web Summary : Bihar's political landscape is shifting. Nitish Kumar will resign, paving the way for a new Chief Minister on April 15th. BJP and NDA meetings are scheduled to select the next leader, with the oath ceremony planned in Patna.
Web Summary : बिहार की राजनीतिक परिदृश्य बदल रहा है। नीतीश कुमार इस्तीफा देंगे, जिससे 15 अप्रैल को एक नए मुख्यमंत्री का मार्ग प्रशस्त होगा। अगले नेता का चयन करने के लिए भाजपा और एनडीए की बैठकें निर्धारित हैं, शपथ ग्रहण समारोह पटना में आयोजित करने की योजना है।