शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
3
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
4
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
5
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
6
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
7
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
8
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
9
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
10
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
11
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
12
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
13
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
14
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
15
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
16
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
17
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
18
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
19
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
20
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!

बिहारमध्ये दारूबंदी केवळ देशीपुरतीच?

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी १ एप्रिलपासून राज्यात दारूबंदी लागू करण्याची घोषणा केली असली तरी आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या या राज्याची ५५०० कोटी रुपयांची

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी १ एप्रिलपासून राज्यात दारूबंदी लागू करण्याची घोषणा केली असली तरी आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या या राज्याची ५५०० कोटी रुपयांची तूट लक्षात घेता ही दारूबंदी केवळ देशी दारूपुरतीच मर्यादित राहण्याची शक्यता असल्याचे महसूल विभागात केलेल्या चौकशीवरून स्पष्ट झाले आहे.या दारुबंदीमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत आयएमएफएल या प्रतिष्ठित कंपनीच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. ‘श्रीमंत लोकांना अल्कोहोलचे दुष्परिणाम ठाऊक आहेत. परंतु गरिबांना त्याची जाणीव नाही. गरीब लोक दारूच्या प्रभावाखाली अधिक हिंसक बनतात,’ या नितीशकुमार यांनी २६ नोव्हेंबर रोजी केलेल्या वक्तव्याचा या अधिकाऱ्याने संदर्भ दिला. सरकारला दारुबंदीवर मर्यादा घालता यावी या उद्देशाने नितीशकुमार यांनी हे संदिग्ध वक्तव्य मुद्दामहून केले होते, असे हा अधिकारी म्हणाला.‘आधी देशी दारूवरील बंदी अमलात येईल,’ असे अबकारी शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सरकारला सर्वाधिक २५०० कोटी रुपयांचे अबकारी शुल्क आयएमएफएलकडून आणि १००० कोटी रुपये व्हॅटच्या रूपाने मिळतात. तर देशी दारू विक्रीतून १५०० कोटींचा महसूल प्राप्त होतो. अशाप्रकारे एकूण महसूल ४००० कोटी आणि व्हॅट १५०० कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होतात.समाजशास्त्रज्ञ व संशोधक राजेश सिंग यांनीही या मताशी सहमती दर्शविली. ते म्हणाले, ‘नितीशकुमार यांनी निवडणूक काळात दिलेली आश्वासने पाळण्यासाठी राज्याला पुढच्या पाच वर्षांत २.७ लाख कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्यात दरवर्षी देशी दारूच्या १०० ते १२० कोटी बाटल्या विकल्या जातात. देशी दारूचे व्यसन जडलेला एक मोठा वर्ग राज्यात आहे. त्यांनी देशी दारू तत्काळ सोडली तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून ही दारुबंदी आंशिक असायला पाहिजे.’ (वृत्तसंस्था)दारूबंदी सरसकट देशी-विदेशी भेद नाहीतथापि ही दारूबंदी सरसकट राहील. देशी वा विदेशी असा भेद केला जाणार नाही, असे राज्याचे अबकारी शुल्कमंत्री अब्दुल जलील मस्तान यांनी स्पष्ट केले; पण दारूबंदीमुळे ५०,००० लोकांचा रोजगार हिरावला जाईल, असे मस्तान यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे.