शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
3
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
4
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
5
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
6
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
7
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
8
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
9
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
10
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
11
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
12
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
13
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
14
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
15
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
16
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
17
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
18
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
19
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
20
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद

बिहारमध्ये 5 वर्षांत दोन डझनांहून अधिक आमदारांच्या संपत्तीत 200 पटीनं वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 14:25 IST

बिहारमधले दोन डझनांहून अधिक आमदार प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. या आमदारांच्या संपत्ती पाच वर्षांमध्ये 200 पटीनं वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे.

पाटणा- बिहारमधले दोन डझनांहून अधिक आमदार प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. या आमदारांच्या संपत्ती पाच वर्षांमध्ये 200 पटीनं वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. प्राप्तिकर विभागानं निवडणूक आयोगालाही या प्रकाराची माहिती दिली आहे. परंतु निवडणूक आयोगाच्या मते आमच्या अखत्यारीत असं कोणतंही प्रकरण नाही.विशेष म्हणजे संपत्तीत 200 पटीनं वाढ झालेल्यांना प्राप्तिकर विभागानं पाठवलेल्या नोटिशीत आरजेडी, जेडीयू व भाजपाच्या आमदारांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाची दृष्टी माजी आमदार व विद्यमान आमदारांवरसुद्धा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आमदारांच्या संपत्तीचं मूल्यांकन करणा-या प्राप्तिकर विभागानं 200 पटीनं संपत्ती वाढलेल्या आमदारांना दंड ठोठावण्याचीही तयारी दर्शवली आहे. जर विद्यमान आमदारांनी स्वतःच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत दिलेली माहिती चुकीची निघाली, तर त्यांनी त्या आमदारकीचं पदही गमवावं लागू शकतं.बिहारमधल्या जवळपास 243 आमदारांच्या घोषित संपत्तीची चौकशी करत आहोत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या एका अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. त्यातील 50हून अधिक आमदारांच्या संपत्तीवर संशय आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रापेक्षा त्यांच्याकडे जास्त संपत्ती आढळून आल्याचा दावा प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यानं केला आहे. तसेच 25हून अधिक आमदारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 5 वर्षांत 200 पटीनं संपत्ती वाढल्याची माहिती दिली, मात्र संपत्ती जमवल्याचा स्त्रोत त्यांना सांगता आला नाही.काही आमदारांनी प्रतिज्ञापत्रातील संपत्तीही कमी दाखवली आहे. नवाडाचे आरजेडी आमदार राज बल्लभ प्रसाद, पातेपूरचे आरजेडीचे आमदार प्रेमा चौधरी, लालगंजचे जेडीयूचे माजी आमदार विजय कुमार शुक्ला, संदेशहून आरजेडीचे आमदार अरुण कुमार व गोविंदपूरमधील काँग्रेसचे आमदार पूर्णिमा यादव यांचंही नाव समाविष्ट आहे. या यादीत भाजपा सरकारमधील मंत्री व मधुबनमधील आमदार राणा रंधीरसह अनेक नावांचा समावेश आहे. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स