शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

जिद्दीला सॅल्यूट! 70 वर्षांच्या शेतकऱ्यानं डोंगर कापून बनवला 5 किमी लांबीचा कालवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 14:24 IST

आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे.

बिहारमधील माऊंटन मॅन दशरथ मांझी यांचे नाव प्रसिद्ध आहे. ज्यांनी 22 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर एक हातोडा आणि छिन्नीसह 360 फूट लांब,  30 फूट रुंद आणि 25 फूट उंच डोंगर कापून रस्ता बनवला. अशाच एका 70 वर्षीय लौंगी भुईया यांनी खेड्यातील शेकडो लोकांच्या अडचणीवर आपल्या कष्टाने मात केली. 30 वर्षांच्या मेहनतीने डोंगर कापून पाच किलोमीटर लांबीचा कालवा बनविला. आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावांतील नागरिकांना याचा फायदा होत आहे.बिहार, गया येथील रहिवासी लौंगी भुईया यांनी कठोर परिश्रम घेऊन एक अनोखं उदाहरण समोर ठेवले आहे, जे कायम लक्षात ठेवले जाईल. 30 वर्ष कष्ट करून त्याने डोंगरावरून पडणा-या पावसाचे पाणी गोळा करून ते गावात आणलं. तो दररोज घरातून निघून थेट जंगलावर जात होता आणि एकट्यानं त्यांनी कालवा बांधण्यास सुरुवात केली. कोठीलवा गावचा रहिवासी असलेला लौंगी भुईया आपला मुलगा, सून आणि पत्नीसमवेत राहतो. भुईयांनी सांगितले की, पहिल्यांदा कुटुंबातील लोकांनी त्याला खूप विरोध केला. पण त्याने ऐकले नाही व कालवा खोदण्याचं काम सुरूच ठेवलं.वास्तविक या भागात पाण्याअभावी लोक केवळ मका आणि हरभरा पिकवत असत. अशा परिस्थितीत गावातील सर्व तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात खेड्यातून शहरात जात होते. कामाच्या शोधात बरेच लोक खेड्यापासून दूर गेले. त्याच वेळी त्यांच्या मनात असा विचार आला की, इथे पाण्याची व्यवस्था असेल तर लोकांचे स्थलांतर रोखता येईल. कठोर परिश्रमानंतर आज कालवा तयार झाला असून, या भागातील तीन गावांतील तीन हजार लोकांना याचा फायदा होत आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जेव्हा केव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा ते घरात कमी आणि जंगलात जास्त दिसले. त्याचबरोबर लौंगी भुईया यांचे म्हणणे आहे की, जर सरकार काही मदत देऊ शकली तर शेतीसाठी ट्रॅक्टरसारख्या सुविधा मिळू शकतील. शेतीसाठी नापीक जमीन सुपीक बनवू शकेल, ज्यामुळे लोकांना खूप मदत होईल. त्याच वेळी लौंगी भुईया यांच्या कार्यामुळे प्रत्येक जण प्रभावित झाला आहे. आज त्यांचे नाव देशाच्या कानाकोप-यात घेतले जात आहे. प्रत्येक जण त्यांना अभिवादन करीत आहे. ज्यांनी 30 वर्षांत पाच फूट रुंद आणि तीन फूट खोल कालवा बनविला आणि हजारो लोकांच्या अडचणी सोडवल्या.