शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

‘रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करा’, लालूंसमोरच RJD नेत्याची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 11:01 IST

Bihar Lok Sabha Election 2024: लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कन्या आणि सारण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांची प्रचारसभा सुरू असताना आरजेडीच्या (RJD) नेत्याने एक अजब विधान केले. भाषण देण्याच्या ओघात त्यांनी रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करायचं आहे, असं विधान केलं.

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रचाराला आता रंग चढला आहे. सर्वपक्षीय नेते प्रचारसभा, मेळावे, रोड शो यांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिप्पण्यांना उधाण आलं आहे. तसेच या ओघात नेतेमंडळींची जीभ घसरण्याचे प्रकारही घडत आहेत. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. येथे लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आणि सारण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रोहिणी आचार्य यांची प्रचारसभा सुरू असताना आरजेडीच्या नेत्याने एक अजब विधान केले. भाषण देण्याच्या ओघात त्यांनी रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करायचं आहे, असं विधान केलं. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली. ही घटना घडली तेव्हा खुद्द लालूप्रसाद यादव मंचावर उपस्थित होते.   

बिहारमधील सारण लोकसभामधून रोहिणी आचार्य निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपाने राजीव प्रताप रुढी यांना उमेदवारी दिलेली आहे. रोहिणी आचार्य यांच्या प्रचारार्थ बुधवारी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेला लालूप्रसाद यादव हेही उपस्थित होते. त्यावेळी आरजेडीचे आमदार सुनील कुमार सिंह भाषण देत आहेत. त्यादरम्यान, सुनील सिंह यांच्याकडून गडबड झाली. ते म्हणाले की, आरजेडीच्या नेत्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की, रोहिणी आचार्य यांचा मोठ्या मताधिक्याने पराभूत करा. मात्र आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुनील सिंह यांनी स्वत:ला सावरले. मला म्हणायचं होतं की रोहिणी आचार्य यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. येणारा इतिहासही रोहिणी आचार्य यांची आठवण काढेल, असे ते पुढे म्हणाले.

राष्ट्रीय जनता दलाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी २ एप्रिलपासून आपल्या प्रचारसभेला सुरुवात केली होती. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी रोहिणी आचार्य यांनी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि बहीण मिसा भारती यांच्यासोबत हरिहरनाथ मंदिरामध्ये जाऊन पूजा केली होती. सारण लोकसभा मतदारसंघात रोहिणी आचार्य यांचा सामना राजीव प्रताप रुढी यांच्याशी होणार आहेत. राजीव प्रताप रुढी हे येथील विद्यमान खासदार आहेत.  

टॅग्स :bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवsaran-pcसरनlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४