शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तेजस एक्स्प्रेसमध्ये अंडरवेयरमध्ये फिरत होते आमदार; प्रवाशांनी रोखताच घातला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 11:12 IST

प्रवाशांनी रोखताच आमदारानं घातला वाद; पोलीस बोलावण्याची वेळ आली

पाटणा: बिहारची राजधानी पाटण्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार गोपाल मंडल अंडरवेअरवर फिरत असल्याचे दिसून आलं आहे. गोपाल मंडल ट्रेनमध्ये अंडरवेअर, बनियानवर फिरत होते. गोपाल यांना अशा अवस्थेत पाहून रेल्वेच्या डब्यात असलेल्या काही प्रवाशांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर मंडल यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ झाला. ट्रेनमध्ये तैनात असलेलं आरपीएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी आमदार मंडल यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

गोपाल मंडल आणि प्रवासी यांच्यात वाद झाला, त्यावेळी तेजस एक्स्प्रेसनं दिलदारनगर रेल्वे स्थानक ओलांडलं होतं. आरपीएफनं घडलेल्या घटनेला दुजोरा दिला आहे. तेजस राजधानी एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या सीट नंबर १३, १४ आणि १५ वरून मंडल प्रवास करत होते. तर जहानाबादमध्ये वास्तव्यास असलेले प्रल्हाद पासवान त्यांच्या कुटुंबासोबत ए-१ कोचच्या सीट नंबर २२, २३ वर होते. दोघांचे तिकीट पाटणा ते नवी दिल्लीपर्यंत होतं.

अंडरवेअर, बनियानवर टॉयलेटला गेले होते मंडलजेडीयूचे आमदार गोपाल मंडल अंडरवेअर आणि बनियानवर टॉयलेटला गेले होते. ते टॉयलेटवरून त्यांच्या आसनाकडे येत असताना प्रल्हाद यांनी आक्षेप घेतला. आसपास महिला प्रवासी आहेत याचं भान ठेवा, असं प्रल्हाद यांनी सांगितलं. मात्र गोपाल मंडल ऐकायला तयार नव्हते. त्यांनी उलट वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानं ट्रेनमध्ये तैनात असलेल्या आरपीएफ टीमनं पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शनवरील रेल्वे पोलिसांना सूचना दिली. 

टॅग्स :Janta Dal Unitedजनता दल युनायटेड