शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
4
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
5
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
6
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
7
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
8
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
9
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
10
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
11
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
12
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
13
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
14
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
15
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
18
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
19
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
20
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

CoronaVirus News: कोरोना लसीचे दोन्ही डोस न घेतल्यास पगार नाही; सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 11:42 IST

CoronaVirus News: लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लढवली शक्कल; प्रशासकीय वर्तुळात पत्राची चर्चा

पाटणा: बिहारमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात दररोज १२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिहारच्या गया जिल्ह्यात एका अधिकाऱ्याच्या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाऱ्यानं पगाराची मदत घेतली आहे. कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार हवा असल्यास त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असं गया आणि बेगुसरायच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रांची सध्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.कोरोनाने सर्वच रेकॉर्ड मोडले! गेल्या 24 तासांत 3,14,835 रुग्ण सापडले; टेन्शन वाढलेगयाचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी २० एप्रिलला एक पत्र जारी केलं आहे. मार्च महिन्याचा पगार हवा असल्यास लसीचे दोन्ही डोस घेतल्याची प्रमाणपत्रं सादर करावी लागतील, याची माहिती आधीच देण्यात आली होती. ही प्रमाणपत्रं जमा केल्यानंतरच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल, याबद्दल पूर्वसूचना देण्यात आली होती, असं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे.तीन दिवसांपासून घरात पडून होता कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह; शेजारी पोहोचताच...काही कर्मचारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरच पगार घेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे आदेशाचं उल्लंघन होत आहे. कर्मचाऱ्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतल्याची प्रमाणपत्रं द्यावीत. त्यानंतरच त्यांना वेतन दिलं जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज १२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. याशिवाय मृत्यूदरातही २० टक्क्यांची वाढ झाली आहे. पाटण्यातील अनेक रुग्णालयांमधील बेड्सची कमतरता आहे. याशिवाय रुग्णांना ऑक्सिजनचादेखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस