शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

३ मुलींनी दिला आई वडिलांच्या तिरडीला खांदा; एकाचवेळी घरातून निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 17:52 IST

आराच्या कतीरा मोहल्ल्यात भाजपा नेते निवृत्त प्रोफेसर महेंद्र सिंह आणि पत्नी प्रोफेसर पुष्पा सिंह राहत होते

आरा - बिहारच्या आरा इथं समाजाच्या जुन्या रुढी परंपरेला छेद देत ३ मुलींनी त्यांच्या आई वडिलांच्या तिरडीला खांदा दिला आहे. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. मुला-मुलींमध्ये आता काहीच फरक नाही. मुलीही आई वडिलांची सेवा करतात असं लोकं म्हणू लागली. ही घटना कतीरा मोहल्ल्याची आहे. जिथं ३० जानेवारीला रात्री स्थानिक भाजपा नेते आणि निवृत्त प्रोफेसर दाम्पत्याची त्यांच्या घरात घुसून काही अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केली. 

या जोडप्याच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करून बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत प्रोफेसर आणि त्यांची पत्नी या दोघांवर हिंदू प्रथा परंपरेनुसार अंत्यविधी करण्यात आला. मृत प्रोफेसरच्या तीन विवाहित मुली रक्षिता सिंह, हर्षिता सिंह आणि अंकिता सिंह यांनी मुलाचं कर्तव्य निभावत आई वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. यावेळी तिघांचे पतीही हजर होते. जावयांनी आई वडिलांसमान सासू-सासऱ्यांना शेवटचा निरोप दिला. 

घरातून एकाचवेळी निघालेली पती-पत्नीची अंत्ययात्रा पाहून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. याठिकाणी भाजपा नेत्यांनी पक्षाचे सदस्य असलेल्या निवृत्त प्रोफेसर महेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर भाजपाचा झेंडा अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक प्रोफेसर दाम्पत्याच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते. 

या जोडप्याच्या शेजारी राहणारे विजय सिंह यांनी अंत्ययात्रेतील दृश्य पाहून म्हटलं की, आज समाजात मुलगा-मुलगी दोघांमध्ये काही फरक नाही. मुली आई वडिलांची सेवा करतात. त्यामुळे आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार मुलींनाही मिळण्याचं स्वातंत्र्य धर्मामध्ये द्यायला हवं. प्रोफेसर महेंद्र सिंह उच्चशिक्षित होते. त्यांच्या मुलींना आई वडिलांच्या तिरडीला खांदा देऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. 

काय आहे घटना?  आराच्या कतीरा मोहल्ल्यात भाजपा नेते निवृत्त प्रोफेसर महेंद्र सिंह आणि पत्नी प्रोफेसर पुष्पा सिंह राहत होते. सोमवारी रात्री त्यांच्या घरात अज्ञात लोकं घुसली आणि त्यांनी प्रोफेसर दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या हल्ल्यात दोघेही मृत्युमुखी पडले. आरा शहरातील सर्वात पॉश परिसरात घडलेल्या या घटनेने सगळीकडे खळबळ माजली. प्रोफेसर महेंद्र सिंह हे भाजपाचे स्थानिक वजनदार नेते होते. ते कुंवर सिंह विश्वविद्यालयात डीन म्हणून काम करत होते. 

प्रोफेसर दाम्पत्याच्या हत्येला ४८ तास उलटले तरीही अद्याप या घटनेतील गुन्हेगारांना शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या घटनेचा तपास एसपी प्रमोद कुमार यादव यांच्या देखरेखीत सुरू आहे. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने चौकशी केली जात आहे. या हत्येतील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.