बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पाटणा शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपले मत नोंदवण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या दोन महिलांना मतदार यादीत नाव असूनही केवळ व्होटर स्लीप नसल्याकारणाने मतदानापासून रोखण्यात आले आहे. या प्रकारामुळे दोन्ही महिलांनी आपला संताप व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
श्रेय मेहता या महिलेने एएनआयला दिलेल्या मुलाखतीनुसार, निवडणूक केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तिला मतदान करू दिले नाही. बीएलओने मला व्होटर स्लीप दिली नाही, ती डिजिटल स्वरुपात डाऊनलोड कर असे सांगितले. माझे नाव मतदार यादीत आहे, तरीही मला तू ती स्लीप आणली नाहीस तर मतदान करू शकत नाहीस, असे सांगण्यात आले आहे. डिजिटल स्लीपही आहे. माझ्याकडे मतदान ओळखपत्र देखील आहे. यादीत १७ नंबरला माझे नावही आहे. सकाळी ६.३० वाजल्यापासून मी रांगेत होते, आता नंबर आला तर मतदान करू दिले नाही. मी आता माघारी जात आहे, मतदान करणार नाही, असे तिने म्हटले आहे.
दुसऱ्याही महिलेचा मतदान रोखल्यावरून हाच आरोप आहे. अनुपमा शर्मा यांनी देखील आपल्याला व्होटर स्लीप नसल्याने मतदान करू दिले नसल्याचा आरोप केला आहे. नाव यादीत आहे, मतदान ओळखपत्र आहे तरीही मला मतदानापासून रोखले आहे. ५ मिनिटे बाजुला थांबण्यास सांगण्यात आले, पहिल्यांदाच असा अनुभव आल्याचा आरोप तिने केला आहे.
निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे.
Web Summary : In Patna, women with names on voter lists were denied voting due to lack of voter slips. Despite having voter IDs and digital slips, they were turned away, raising concerns about the election process.
Web Summary : पटना में, मतदाता सूची में नाम होने के बावजूद वोटर स्लिप न होने के कारण महिलाओं को मतदान से वंचित कर दिया गया। वोटर आईडी और डिजिटल स्लिप होने पर भी उन्हें लौटा दिया गया, जिससे चुनाव प्रक्रिया पर सवाल उठ रहे हैं।