शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 17:22 IST

बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे.

Bihar Election 2025:बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपसह काँग्रेसने राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा सुरू केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बक्सरमधील एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या जेडीयू आणि भाजप युतीला संधीसाधू म्हटले. 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बक्सर येथील दलसागर स्टेडियमवर आयोजित 'जय बापू, जय भीम, जय संविधान' रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युतीला संधीसाधू म्हटले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि आरएसएसवर धमकीचे राजकारण केल्याचा आरोपही केला.

खरगे पुढे म्हणाले, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार फक्त सत्तेसाठी वारंवार बाजू बदलतात. नितीश यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या विचारधारेशी व्यक्तीशी युती केली आहे. बिहारच्या जनतेने मुख्यमंत्र्यांना विचारावे की, 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला दिलेल्या 1.25 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? आता बिहारमधून एनडीए सरकार गेलं पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणावर खरगे काय म्हणाले?मल्लिकार्जुन खरगेंनी यावेळी नॅशनल हेराल्ड प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल करून भाजप सूडाचे राजकारण करत आहे. पण, आम्ही घाबरणार नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुर्बल घटकांच्या विरोधात असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

वक्फवर खरगे काय म्हणाले?भाजपचे लोक धर्माच्या नावाखाली लोकांना फूट पाडतात. हे लोक महिला, गरीब आणि मागासलेल्यांच्या हिताचा विचार करू शकत नाहीत. भाजप आणि संघाने जाणूनबुजून वक्फ दुरुस्ती विधेयक आणले आहे. याद्वारे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेस