शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

Bihar Election 2020 : बिहार पॉलिटिकल लीगमध्ये 'ही' होती तेजस्वी यादव यांची टीम...

By ravalnath.patil | Updated: November 9, 2020 11:31 IST

Bihar Election 2020 : एक्झिट पोलनुसार, तेजस्वी यादव बिहारच्या पॉलिटिकल लीगमध्ये मोठी बाजी मारणार असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देतेजस्वी यादव क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कोणताही मोठा करिश्मा दाखवू शकत नाहीत, मात्र, लालू यादव यांच्या अनुपस्थितीत राजकीय मैदानात उतरुन यशस्वी राजकारणी होण्याचे आपले कौशल्य त्यांनी निश्चितपणे दाखवून दिले आहे.

पटना : आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा राजकीय वारसा लाभलेले त्यांचे छोटे पुत्र तेजस्वी यादव बिहारमधील सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होण्याची चिन्हे दिसत आहेत. तेजस्वी यादव क्रिकेटच्या मैदानावर आपला कोणताही मोठा करिश्मा दाखवू शकत नाहीत. मात्र, लालू यादव यांच्या अनुपस्थितीत राजकीय मैदानात उतरुन यशस्वी राजकारणी होण्याचे आपले कौशल्य त्यांनी निश्चितपणे दाखवून दिले आहे. एक्झिट पोलनुसार, तेजस्वी यादव बिहारच्या पॉलिटिकल लीगमध्ये मोठी बाजी मारणार असल्याचे दिसून येत आहे.

आरजेडीचे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी 'या' नेत्यांची महत्वाची भूमिका होती. जे तेजस्वी यादव यांचे नाक, कान आणि डोळे मानले जातात. याच नेत्यांच्या चमूने बिहार निवडणुकीच्या राजकीय लढाईत तेजस्वी यादव यांच्या आक्रमक निवडणूक प्रचाराच्या क्षेत्ररक्षणाची रणनीती तयार केली आणि आता निकाल पक्षाच्या बाजूने जाताना दिसत आहेत. आज आम्ही 'या' नेत्यांचा उल्लेख करत आहेत, ज्यांना तेजस्वी टीमचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते.

जगदानंद सिंह जगदानंद सिंह हे ७४ वर्षांचे ज्येष्ठ नेते तेजस्वी यादव यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. जगदानंद हे बिहारमधील काही दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांना लालू कुटुंबाशी निष्ठावान मानले जाते. आरजेडीचे संस्थापक सदस्यासह सध्या बिहारमधील पक्षाची कमांड त्यांच्या हातात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे राजकीय कौशल्य सर्वांना माहित आहे, ज्यावेळी बक्सरमधील जगदा बाबू यांनी भाजपाचे बलवान नेते लालमुनी चौबे यांना पराभूत केले होते. जगदानंद सिंह यांचे राजकीय निर्णय इतके तंतोतंत आहेत की कोणत्याही सामान्य नेत्याला किंवा कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत वाद घालणे अवघड जाते.बिहार निवडणुकीपूर्वी आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच त्यांनी आपली राजकीय वृत्ती दाखवायला सुरुवात केली. जगदानंद सिंह यांनी तेजस्वी यादव यांना महाआघाडीच्यावतीने मुख्यमंत्रिपद बनविण्याची घोषणा केली. इतकेच नव्हे तर आरजेडीच्यावतीने या विषयावर कडक भूमिका घेण्याबरोबरच त्यांनी डाव्या पक्षांशी युतीसाठी एक स्क्रिप्टही लिहिली. लालूंच्या अनुपस्थितीत बिहारच्या ३१ वर्षीय तेजस्वी यादव यांच्या आक्रमक पवित्रामागे जगदानंद सिंह यांचे मोठे योगदान आहे. याशिवाय जगदानंद सिंह यांनीही उमेदवारांच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मनोज झा आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा बिहार निवडणुकीत आरजेडीच्या राजकीय रणनीतीतील नेत्यांमध्ये समोर आले आहेत. पक्षाच्या विजयासाठी त्यांनी रणनीती आखली, ती तेजस्वी यादव यांनी यशस्वीपणे मैदानात उतरवली. मनोज झा यांची स्वत: ची राजकीय उंची असून समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी देशभर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.सामाजिक न्याय या विषयाचे ते एक संशोधक आणि मास्टर म्हणून देखील ओळखले जातात. २०१५ च्या निवडणूकीत नितीशकुमार ज्याप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित करीत असत, त्याचप्रमाणे यंदाच्या बिहार निवडणुकीत मनोज झा पार्टीवतीने माध्यमांसमोर येत आणि एनडीएला घेरत असत. राजकीय अर्थशास्त्र, सामाजिक चळवळ, जातीय संबंध आणि तणाव या विषयावर आपल्या मतासाठी ते देशभरात ओळखले जातात. एवढेच नव्हे तर ते देशातील सामाजिक चळवळींमध्येही सहभागी आहेत आणि आपला मुद्दा आटोक्यात ठेवतात. संसदेपासून ते रस्त्यापर्यंत, ते प्रत्येक विषयावर संघर्ष करणारे नेते मानले जातात. दिल्लीत मनोज झा हे आरजेडी प्रमुख लालू यादव यांचे मेसेंजर म्हणून ओळखले जातात आणि केंद्रीय राजकारणात पक्षाचा चेहरा आहेत. अशा परिस्थितीत त्यांना विरोधी पक्षांसह सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळू शकेल.

संजय यादवहरियाणाच्या महेंद्रगढमधून शाळा आणि दिल्लीतून एमएससी आणि त्यानंतर एमबीए करणारे संजय यादव आरजेडी नेते तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागार आहेत. आरजेडीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रचाराचा पदभार स्वीकारण्यापूर्वी संजय यादव आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत सावली प्रमाणे उभे आहेत. ते पक्षासाठी पडद्यामागून काम करत आहेत. या निवडणुकीत संजय यादव आरजेडी आणि तेजस्वी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटपासून ते त्यांच्या मोर्चाच्या रूपरेषापर्यंत सर्व काही ठरवत होते. २०१५ च्या निवडणुकीतही संजय यादव हे आरजेडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. या निवडणुकीत संजय यांनी युवा संवाद सारख्या कार्यक्रमाची पटकथा लिहिली होती, त्यावर आरजेडीने एनडीएला घेरले होते.संजय यादव यांनी आपल्या एका मुलाखतीत, तेजस्वी यादव यांच्यासोबत आपण कसे आलो, हे सांगितले होते. संजय एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करत होते आणि एका सामान्य मित्राच्या माध्यमातून तेजस्वी यादव यांना भेटले. यानंतर त्यांनी सर्व वेळ राजकारणात घालविण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१२ मध्ये तेजस्वी यादव यांनी संजय यादव यांना नोकरी सोडा आणि पार्टीत येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि तेव्हापासून ते तेजस्वी यादव यांच्याबरोबर कार्यरत आहेत.

आलोक कुमार मेहताआलोक कुमार मेहता हे रणनीतिकार नेते आहेत ज्यांनी बिहार निवडणुकीत आरजेडीच्या विजयाची पटकथा लिहिली. आरजेडीचे विद्यमान राष्ट्रीय प्रधान सरचिटणीस आणि पक्षाच्या संघटनेला सक्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आलोक कुमार हे आरजेडीचे प्रभारी तसेच युवा आरजेडीचे राष्ट्रीय सरचिटणीसही राहिले आहेत. ते २०१४ मध्ये लोकसभेचे खासदार होते आणि २०१५ मध्ये उझीरपूर येथून आमदार म्हणून निवडून गेले आणि महायुतीच्या सरकारमध्ये सहकार खात्याचे मंत्री म्हणून काम केले, त्या माध्यमातून ते तेजस्वी यादय यांच्या जवळ आले आणि त्यांचे विश्वासू झाले.

प्रा. रामबली चंद्रवंशीनितीशकुमार यांची मागासवर्गीय वोटबँक फोडण्यासाठी आरजेडीच्यावतीने प्रा. रामबलीसिंग चंद्रवंशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रामबाली हे तेजस्वी यादव यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. ते पाटण्यातील बीएन कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, ज्यांना नुकतीच आरजेडीने एमएलसी केले होते. बिहार निवडणुकीच्या घोषणेपूर्वी प्रा. रामबली चंद्रवंशी यांनी राज्यभर फिरून मागासवर्गीय परिषदेचे आयोजन केले होते. या माध्यमातून बिहारच्या १२७ जातींमध्ये पोहोचले. त्यामुळे निवडणुकीत आरजेडीला प्रचंड फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. 

डॉ. उर्मिला ठाकूर आरजेडी महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. उर्मिला ठाकूर या देखील तेजस्वी यादव यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानल्या जातात. महिलांमध्ये आरजेडीसाठी जागा तयार करण्यात उर्मिला ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून याचा परिणाम निवडणुकांमध्ये होताना दिसत आहे. एक्झिट पोलमध्येही ४७ टक्के महिलांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदी निवडण्याची पहिली पसंती जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त, उर्मिला ठाकूर युवा नोकरीच्या संवादातील व्यासपीठावर तेजस्वी यादव यांच्यासोबत ठामपणे उभ्या होत्या.

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक