शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Chamki Fever: बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने 137 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 11:11 IST

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे.एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात 116 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल रुग्णालयामध्ये 21 मुलांचा मृत्यू झाला आहे.

मुजफ्फरपूर  - बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूरमध्ये इन्सेफेलाईटीस या आजाराने आणखी 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात 116 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल रुग्णालयामध्ये 21 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात मुलांना ताप येतो. त्यांच्यावर सध्या अनेक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाईटीस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने 22 मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होत असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. 

2014 पासून इन्सेफेलाईटिस हा आजार मुलांना होत आहे. पाच ते दहा वयोगटातील मुलांना हा आजार होतो. तसेच यामुळे दरवर्षी अनेक मुलांचा मृत्यू होतो. मात्र तरीही सरकारने याबाबत अज्ञाप गंभीर दखल घेतलेली नसल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. डोकं दुखणं, अशक्तपणा येणं, उलट्या होणं, भूक न लागणं, अतिसंवेदनशील होणं ही या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे अशा गोष्टींचा त्रास होत असल्याचं त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

लिची खाल्ल्याने बिहारमधील बालकांचा मृत्यू? जाणून घ्या खरे कारणलिची हे फळ खाल्ल्याने बिहारमध्ये अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत 179 या तापाचे संदिग्ध रुग्ण आढळले आहेत. रिकाम्या पोटी लिची खाल्ल्याने मुले या रोगाची बळी पडल्याचे सांगितले जाते. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम  (AES) म्हणजे शरिरातील मुख्य मज्जासंस्थेला प्रभावित करतो. लहान मुलांची मज्जासंस्था कमजोर असल्याने त्यावर जास्त परिणाम होतो. सुरुवातीला जोरदार ताप येतो. यानंतर शरीर दुखणे, हालचालीवर परिणाम, मानसिक अस्वस्थता, बेशुद्ध होणे, आकड्या येणे, भीती, कोमामध्ये जाणे अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. हा आजार जून ते ऑक्टोबर दरम्यान बळावतो. 

लिचीचे कनेक्शन काय?

'द लॅन्सेट' नावाच्या मोडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये लिचीचे प्राकृतिक रूप हाइपोग्लीसीन ए मध्ये मोडते. यामुळे शरीरात फॅटी अ‍ॅसिड बनविण्यास व्यत्यय येतो. यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण घसरते आणि मेंदूशी संबंधीत आजार वाढू लागतो. सकाळी किंवा सायंकाळी उपाशीपोटी लिची न खाण्याचा सल्ला बिहारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. बिहारमध्ये कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. यामुळे तेथील मुले कमजोर असतात. यामुळे या सिंड्रोमचा जादा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AES Diseaseएक्यूट कोरोनरी सिंड्रोमBiharबिहारDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर