पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. बक्सर जिल्ह्यातील नंदनमध्ये समिक्षा यात्रेसाठी ते गेले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत नितीश कुमार थोडक्यात बचावले आहेत. दगडफेकीत नितीश कुमारांच्या ताफ्यातील अनेक सुरक्षारक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, नंदर गावातील लोक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना दलित वस्तीमध्ये बोलवण्याची मागणी करत होते. याच मुद्द्यावरून स्थानिक लोक आणि अधिका-यांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतप्त लोकांनी दगडफेक केली होती. ज्यात अनेक सुरक्षारक्षक गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. नंदर गावात अनेक विकासाची कामं प्रलंबित आहेत. त्यामुळे लोक नितीश कुमारांनी भेट देऊन पाहणी करण्याची मागणी करत होते. परंतु नितीश कुमार नंदर गावातून निघून गेले आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 18:38 IST