शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:57 IST

त्याचबरोबर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याबाबत महागठबंधनमध्ये दावा करू 

विभाष झा -

पाटणा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढले आहे. याची झलक केवळ कर्नाटकमध्येच नव्हे तर शेकडो किलोमीटर दूर असलेल्या बिहारमध्येही पाहण्यास मिळत आहे. कर्नाटकचे निकाल काँग्रेससाठी आशेचा किरण घेऊन आले आहेत. याचा परिणाम देश व अनेक राज्यांत होणाऱ्या आगामी निवडणुकांतही पाहावयास मिळू शकतो. उत्साहित कार्यकर्त्यांनी यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, कर्नाटकच्या निकालाचा परिणाम बिहारमध्येही पाहण्यास मिळेल. म्हणजेच बिहार मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आता अधिक मंत्री करण्याची मागणी करणार आहेत. त्याचबरोबर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याबाबत महागठबंधनमध्ये दावा करू शकते. महागठबंधनच्या सरकारमध्ये सहभागी सात पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसचे सध्या दोन मंत्री आहेत. पक्षाची मागणी आहे की, ही संख्या ३ किंवा ४ करावी; परंतु याबाबत अद्याप सहमती झालेली नाही. आता कर्नाटक निवडणुकांचे निकाल येताच काँग्रेस नितीशकुमार सरकारवर दबाव आणणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. म्हणजेच मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोट्यातील मंत्र्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, प्रदेश नेतृत्वाने याबाबत आधीच तयारी करून ठेवली आहे. राज्य मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोट्यातून आणखी मंत्री केले जातील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश कुमार सिंह यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे.

निवडणुकीबाबत तयारीला वेग-  राज्यात आता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. -  तथापि, काँग्रेसचे नेते याबाबत बोलत नाहीत. -  सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने सुमारे १२ नेत्यांना लढविण्याची तयारी केली आहे. -  यासाठी महागठबंधनमधील सात पक्षांत कसा समन्वय साधला जातो, हे लवकरच कळेल. 

टॅग्स :Biharबिहारcongressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक