शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिहार बोर्डाच्या परीक्षेत ४८९ गुणांचा योगायोग, तर तब्बल ६० मुली टॉप १० मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:40 IST

Bihar Board 10th Result: बिहारमधील बिहार शालेय परीक्षा मंडळाचा (बीईएसबी) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर आता संपूर्ण शैक्षणिक वर्तुळामध्ये ४८९ या क्रमांकाची खूप चर्चा होत आहे.

बिहारमधीलबिहार शालेय परीक्षा मंडळाचा (बीईएसबी) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या निकालानंतर आता संपूर्ण शैक्षणिक वर्तुळामध्ये ४८९ या क्रमांकाची खूप चर्चा होत आहे. त्याचं कारण म्हणजे राज्यातील तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८९ गुण मिळाले असून, हे तिघेही संयुक्तरीत्या राज्यातून प्रथम आले आहेत. त्यामध्ये साक्षी कुमारी आणि अंशु कुमारी या दोन विद्यार्थिनी आणि रंजन वर्मा या विद्यार्थ्याचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पहिल्या १०मध्ये स्थान मिळवणाऱ्या एकूण १२३ विद्यार्थ्यांमध्ये ६० मुलींचा समावेश आहे.

पुनीत कुमार सिंह, सचिन कुमार राम आणि प्रियांशू राज यांनी ४८८ गुणांसह संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिला पाच क्रमांकांमध्ये २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर ६ ते १० या क्रमांकांमध्ये  ९८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बिहारच्या दहावीच्या परीक्षेत पहिल्या १० क्रामांकांमध्ये १२३ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलं आहे. त्यात ६३ विद्यार्थी आणि ६० विद्यार्थिनींचा समावेश आहे. गतवर्षी पहिल्या दहा क्रमांकांमध्ये ५१ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलं होतं. तसेच त्यात २३ विद्यार्थिनींचा समावेश होता.

दरम्यान, बिहार बोर्डाने यावर्षी पहिल्या १० क्रमांकांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ केली आहे. पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला २ लाख रुपये, एक लॅपटॉप आणि पदक दिलं जाईल. तर दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला १.५ लाख रुपये,  एक लॅपटॉप आणि पदक दिलं जाईल. तर तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला १ लाख रुपये, लॅपटॉप आणि पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. तर चौथ्या क्रमांकापासून दहाव्या क्रमांकापर्यंतच्या विद्यार्थ्यांना २० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. 

टॅग्स :BiharबिहारEducationशिक्षणexamपरीक्षा