शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

हृदयद्रावक! घरात सुरू लग्नाची तयारी, लेकीच्या कन्यादानापूर्वी बापाचं शिर धडावेगळं; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 10:03 IST

सुखी संसार सुरू होण्याआधीच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या कन्यादानापूर्वीच वडिलांनी जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली.

नवी दिल्ली - घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना एक भयंकर घटना घडली आणि क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. लग्नाआधीच नववधूच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सुखी संसार सुरू होण्याआधीच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या कन्यादानापूर्वीच वडिलांनी जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या औरंगाबादमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती तिथेच काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. 

शनिवारी रात्री थ्रेसर मशीनमध्ये डोकं अडकल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. घरातील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडलं आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परसा गावात अर्जुन भुईया याचं 35 वय होतं. तो गावात जयराम शर्माच्या ट्रॅक्टरमध्ये लावलेल्या थ्रेसर मशीनने शेत कापणीचं काम करीत होता. शनिवारी ते घरातून जेवण करून शेत कापणीसाठी निघून गेला. 

जाताना सकाळीच येणार असल्याचं त्याने सांगितलं. तो रात्रीच्या वेळेत शेत कापत होता. अचानक त्याचं डोकं थ्रेसर मशीनमध्ये अडकलं. काही करेपर्यंत त्याचं डोकं मशीनने कापलं गेलं होतं. रक्तबंबाळ होऊन तो तेथेच पडला. डोक्याला इतकी गंभीर जखमी झाली की, त्याचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनाच मोठा धक्का बसला. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. 

पोलिसंनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. अर्जुनच्या मुलीचं 17 एप्रिलला लग्न होणार होतं. कुटुंबात मुलीच्या लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं. घरात तयारी सुरू होती. नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती. मात्र याचदरम्यान अर्जुनच्या मृत्यूमुळे आनंदावर विरजण पडलं. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बापाच्या मृत्यूमुळे मुलीला मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्न