शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांचा मोठा कट ATSनं आणला उजेडात, तब्बल 7 हजार सिम कार्ड्स केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 17:52 IST

संपूर्ण देशात दहशतवाद परसवण्याचा कट एटीएसनं उजेडात आणला आहे.

बिहार - झारखंडसहीत संपूर्ण देशात दहशतवाद परसवण्याचा दहशतवाद्यांचा कट एटीएसनं उजेडात आणला आहे. रांचीमध्ये या कटाचा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांच्या अनेक पथकांनी एकत्र येऊन रांचीतील वेगवेगळ्या परिसरात छापेमारी करत तब्बल 7 हजार सिम कार्ड जप्त केले आहेत. एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सिम कार्ड्सद्वारे दहशतवादी देशात सामाजिक तेढ निर्माण होतील, असे मेसेज व्हायरल करत होते. रांची पोलीस आणि सायबर पोलिसांनी रांचीतल कांटाटोलीतील हासिब इंक्लेवच्या फ्लॅट आणि कांकेतील भीठा परिसरातील एका घरावर छापेमारी केली. 

या छापेमारीदरम्यान त्यांनी हजारोंच्या संख्येनं सिम कार्ड्स जप्त केली. शिवाय, सिम बॉक्स आणि मॉनिटरही ताब्यात घेतले. तसंच पोलिसांनी जवळपास 12 जणांना चौकशीसाठीही ताब्यात घेतलं आहे. मात्र या मागील मुख्य सूत्रधार जावेदपर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत. 

ताब्यात घेतलेला एक जण जावेदचा नातेवाईक आहे. याप्रकरणी छापेमारी करण्यात आलेल्या फ्लॅटच्या मालकाचीही पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान, रांचीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात सिम कार्ड्स जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.  या सिम बॉक्सच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश आणि अरब देशांमध्ये बातचित केली जात होती आणि मेसेजही पाठवले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. सिम बॉक्स आणि हजारो सिम कार्ड्सचा वापर करणाऱ्या टेरर कनेक्शनची चौकशी रांची पोलीस आणि एटीएसची टीम करत आहे.  

 

टॅग्स :TerrorismदहशतवादBiharबिहार