शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 14:37 IST

Chirag Paswan News: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Chirag Paswan in Bihar Assembly Election: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचे प्रमुख चिराग पासवानबिहार विधानसभा निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. चिराग पासवान यावेळी निवडणूक लढवतील की नाही, यावर राज्यात चर्चा तीव्र झाल्या आहेत. दरम्यान, पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत चिराग पासवान यांनी ही निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्षाचे नेते घेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अलीकडेच पाटणा येथे झालेल्या लोजपाच्या कार्यकारिणी बैठकीत चिराग पासवान 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' बोलले. या घोषणेशी राज्यातील जनता जोडलेली आहे. लोजपा कडून एक सर्वेक्षण देखील करण्यात आले, ज्यात चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी अनेकांची मागणी आहे. 

बिहारच्या लोकांचा चिराग यांच्यावर विश्वासया सर्वेक्षणात असे आढळून आले की, बहुतांश लोकांचा असा विश्वास आहे की, चिराग पासवान यांनी बिहारमध्ये येऊन बिहारींसाठी काम करावे. मात्र, अंतिम निर्णय चिराग पासवान यांनाच घ्यायचा आहे.

कोणत्या जागेवरून निवडणूक लढवू शकतात?सूत्रांच्या माहितीनुसार, चिराग पासवान बिहार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतात, तर त्यांच्यासाठी काही जागाही निश्चित झाल्या आहेत. चिराह पटना, दानापूर किंवा हाजीपूर यापैकी कोणत्याही एका जागेवरून निवडणूक लढवू शकतात असे मानले जाते.

चिराग यांची लोकसभेत चांगली कामगिरीचिराग पासवान हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. चिराग यांच्या लोजपाने पाच जागांवर लोकसभा निवडणूक लढवली आणि सर्व जागा 100 टक्के स्ट्राइक रेटने जिंकल्या. चिराग स्वतः हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि त्यांना केंद्रात अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी आता फारसा वेळ शिल्लक नाही. अशा परिस्थितीत, त्यांच्या पक्षाला चिराग यांची राज्यात रास्त गरज आहे.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024chirag paswanचिराग पासवान