शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Results : झेंड्याच्या वादावरून भाजपा-राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी; अनेक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 14:17 IST

Bihar Assembly Election Results : सीवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडली.

ठळक मुद्देनिकालानंतर सीवानमध्ये बुधवारी भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. जखमींना सीवानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीवान : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालानंतर सीवानमध्ये भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, घटनेतील पीडितांकडून पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सीवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडली. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार देवेशकांत सिंह यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजदचे काही समर्थक जखमी झाले आहेत. जखमींना सीवानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?अंगया गावातील काही दलित आणि कुशवाहा कुटुंबीयांनी आपल्या घरांवर राजदचा झेंडा लावला होता. यावरून गावातील भाजपा समर्थक नाराज होते. त्यानंतर निवडणुकीचा निकाल हाती येताच भाजपाच्या समर्थकांचा जोर वाढला आणि बाचाबाचीला सुरुवात झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजदचे समर्थक गंभीर स्वरुपात जखमी झाले. त्यांच्यावर सीवानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी समर्थकांच्या म्हणण्यानुसार, घरावर राजदचा झेंडा लावण्यावरून गावात भाजपा समर्थक नित्यानंद सिंह यांच्यासहित १४ जणांनी मारहाण केली. दरम्यान,  या घटनेची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

निकालाकडे सर्वांचे लक्ष...बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकाचा निकाल आता सर्वांसमोर आला आहे. बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मंगळवारी रात्री एनडीएने १२२ बहुमताचा जादूई आकडा पार करताच एकच उत्सवाचे वातावरण झाले. रात्री एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आणि बिहारच्या लोकांनी एनडीएला पुन्हा एकदा राज्याची सत्ता सांभाळण्याची संधी दिली. पण भाजपाला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे. 

नितीशकुमार यांनी भाजपा मुख्यमंत्रीपद देणार का?शिवसेनेपाठोपाठ अकाली दलानेही भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दल भाजपाचा सर्वात मोठा सहकारी पक्ष म्हणून समोर आला. मात्र आपल्याहून कमी जागा जिंकणाऱ्या नीतिशकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची भूमिका भाजपाने कायम ठेवली, तरच एनडीएचे अस्तित्त्व टिकेल. २०१४ साली लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली. पण नंतर शिवसेना-भाजपा युती सरकार झाले. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत युती कायम राहिली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. जदयूनेही पंतप्रधान मोदी यांना विरोध करून एनडीएला काही काळ सोडचिठ्ठी दिली होती.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल