पाटणा - बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) म्हणजेच एलजेपी या पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी २९ जागा मिळविण्यासाठी भाजप, जनता दल (यू) पक्षाबरोबर खूप वाटाघाटी केल्या होत्या. त्यातील १९ जागा या पक्षाने आतापर्यंत जिंकल्या आहेत. या निवडणुका एनडीएच्या विजयासाठी आणि जनता दल (यू)चे प्रमुख नितीशकुमार आणि पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावी जोडीसाठी लक्षात राहतील. मात्र, चिराग पासवानने स्वतःची राजकीय ओळख या निवडणुकांतून अधिक मजबूत केली आहे. (वृत्तसंस्था)
काकांनी पक्ष फोडला, पण चिरागनी हार मानली नाही२०२०च्या विधानसभा निवडणुकांनंतर हा पक्ष जवळजवळ संपल्याचे मानले जात होते. सन २०२१मध्ये चिराग यांच्या काकांनी - पशुपतीकुमार पारस यांनी रामविलास पासवान यांच्या वारशावर दावेदारी करत पक्ष फोडला. मात्र, त्यानंतर चिराग पासवान खऱ्या अर्थाने अधिक सक्रिय झाले. या मेहनतीचे फळ लोकसभा आणि आता विधानसभेतही मिळाले. रामविलास पासवान यांची परंपरा पुढे नेण्याचा करिष्मा त्यांचे पुत्र चिराग यांच्याकडे नाही, असे मत त्यांनी आता खोडून काढले आहेत.
लोक जनशक्ती पार्टीचा स्ट्राइक रेट कसा राहिला? ६९% विधानसभा निवडणूक - २९ पैकी १९ जागा जिंकल्या.१००% लोकसभा निवडणूक - २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये चिराग आणि त्यांच्या पक्षाने लढवलेल्या पाचही जागा जिंकल्या होत्या.
चिराग पासवान यांचे राजकीय डावपेच यशस्वीएनडीएतील भाजपा आणि जनता दल (यू) हे प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी बिहारच्या २४३ जागांपैकी २०पेक्षा अधिक जागा एलजेपीला देण्यास तयार नव्हते. चिराग पासवान यांनी राजकीय डावपेच म्हणून प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षाशी चर्चा सुरू केली. त्यामुळे अखेर भाजप, जनता दल (यू)ने चिराग पासवान यांना विधानसभेच्या २९ जागा दिल्या. चिराग यांनी आपल्या पक्षाला त्यांच्या नेतृत्त्वाखालील उत्तम विजय मिळवून दिला.
Web Summary : Chirag Paswan, after facing a party split, strengthened his political standing in the Bihar elections. LJP won 19 out of 29 contested seats, proving Paswan's leadership and exceeding expectations after initial setbacks. His strategic negotiations secured more seats, leading to a significant victory.
Web Summary : पार्टी विभाजन का सामना करने के बाद, चिराग पासवान ने बिहार चुनावों में अपनी राजनीतिक स्थिति मजबूत की। एलजेपी ने 29 में से 19 सीटें जीतीं, जिससे पासवान का नेतृत्व साबित हुआ और प्रारंभिक असफलताओं के बाद उम्मीदों से बेहतर प्रदर्शन किया। उनकी रणनीतिक वार्ताओं से अधिक सीटें सुरक्षित हुईं, जिससे महत्वपूर्ण जीत मिली।