शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Bihar Assembly Election : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; मोदी, शाहंनी केलं असं आवाहन

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 3, 2020 08:19 IST

बिहार निवडणुकीबरोबरच 'या' 11 राज्यांतील 54 विधानसभा जागांसाठीही पोट निवडणूक...

ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज एकूण 17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे.11 राज्यांतील 54 विधानसभा जागांसाठीही पोट निवडणूकही होत आहे.उत्तर प्रदेशात 2022च्या निवडणुकीची लिटमस टेस्ट.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज एकूण 17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 1463 उमेदवार नशीब आजमावत असून, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, शिवहर, सीतामढी, मधुबनी, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, छपरा, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, नालंदा आणि पाटणा, या जिल्ह्यांत मतदान होत आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी मतदारांना केले असे आवाहन -दुसऱ्या टप्प्यातील या मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी एक ट्विट करत म्हटले आहे, ‘बिहार विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. मी सर्व मतदारांना आवाहन करतो, की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा  हा उत्सव यशस्वी करावा. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून मास्कचादेखील वापर करावा'

गृह मंत्री अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘बिहारच्या प्रत्येक नागरिकाच्या अत्यंत मुल्यवान मतानेच राज्याला लूट आणि गुन्हेगारीच्या काळ्या युगातून बाहेर काढून विकास आणि सुशासनाच्या सोनेरी रस्त्यावर आणले आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदारांना आवाहन करतो, की राज्यातील शांतता, समृद्धि आणि प्रगती कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करा.’

11 राज्यांतील 54 विधानसभा जागांसाठीही पोट निवडणूकबिहारमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाबरोबरच देशातील 11 राज्यांतही 54 विधानसभा जागांवर पोट-निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशातील सात विधानसभा जागांवर 88 उमेदवार नशीब आजमावत आहेत. येथे भाजपा, सपा, काँग्रेस आणि बसपाने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. या पोटनिवडणुकीचा योगी सरकारवर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नसला तरी, याकडे 2022च्या निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे.

उत्तर प्रदेश शिवाय, मध्य प्रदेशातील 28, गुजरात मधील 8, कर्नाटक, ओडिशा, झारखंड आणि नगालँडमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगाणा, छत्तीसगज आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेसाठी पोट-निवडणूक होत आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकVotingमतदानNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा