शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

नितीश कुमार भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण..; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:56 IST

Bihar Assembly Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

Bihar Assembly Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यंदाची निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे भाजपने यापूर्वीच जाहीर केले आहे. अशातच, निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बुधवारी मोठा दावा केला. ते म्हणाले की, नितीशकुमार बिहारमध्ये भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण नंतर पक्ष बदलू शकतात. मात्र, नितीश कुमारांची लोकप्रियता आता संपली आहे, त्यामुळे ते सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

पश्चिम चंपारण येथील पत्रकार परिषदेत किशोर म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये निवडणुका संपल्यानंतर नितीश कुमार वगळता कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. मी लिहून देतो. मी चुकीचा सिद्ध झालो, तर राजकारण सोडेन. नितीश कुमारांच्या भाजपशी असलेल्या संबंधांबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, ते भाजपसोबत युती करून निवडणूक लढवतील आणि नंतर इतर पक्षाकडे जातील. नितीश कुमारांची लोकप्रियता कमालीची घसरल्याने भाजप यावेळी नितीश यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

नितीश पुन्हा मुख्यमंत्री होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी निवडणुकीनंतर नितीश कुमार पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहण्याची घोषणा केली, तर भाजपला जागा जिंकणे कठीण होईल. जेडीयू यंदाच्या निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरी करणार आहे. नितीश कुमारांना समजेल की, भाजप आपल्याला पाठिंबा देणार नाही, तेव्हा ते पुन्हा बाजू बदलू शकतात. परंतु जेडीयूच्या जागा इतक्या कमी असतील की, त्यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही. 

नितीश कुमार शारीरिकदृष्ट्या थकले प्रशांत किशोर पुढे म्हणतात, नितीश कुमार शारीरिकदृष्ट्या थकलेले आणि मानसिकदृष्ट्या निवृत्त झाले आहेत. मुख्यमंत्री आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची नावेही कागदपत्रे पाहिल्याशिवाय सांगू शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. तसेच, अनेक दशकांपासून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यातील सत्ता संघर्षात अडकलेल्या या “राजकीय दलदलीतून” बिहारला बाहेर काढण्यासाठी त्यांचा जन सूरज पक्ष तयार आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीPrashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारElectionनिवडणूक 2024