बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील मोकामा टाल क्षेत्रात प्रचारादरम्यान दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी आणि गोळीबाराची घटना घडली. या घटनेमध्ये जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रियदर्शी यांचे समर्थक दुलारचंद यादव गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना घडली तेव्हा दुलारचंद यादव हे प्रचारामध्ये गुंतले होते.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मोकामा टाल क्षेत्रातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार पियूष प्रियदर्शी यांचा प्रचार सुरू होता. यादरम्यान, दोन गटांमध्ये वाद झाला. तसेच वादाचं पर्यावसान हाणामारी आणि गोळीबारात झाले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. यादरम्यान, दुलारचंद यादव यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
दुलारचंद यादव हे एकेकाळी लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जात होते. सध्या ते मोकामामधील उमेदवार पियूष प्रियदर्शी यांना पाठिंबा देऊन प्रचारामध्ये गुंतले होते. चार दिवसांपूर्वी दुलारचंद यादव यांनी लल्लू मुखिया यांच्या समर्थनार्थ एक गीतही गायलं होतं. एवढंच नाही तर मोकामा टाल क्षेत्रामध्ये त्यांचा बऱ्यापैकी धाक होता. या प्रकरणी आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Bihar election campaign turns deadly. A leader supporting Prashant Kishor's Jan Surajya Party was shot dead during a clash in Mokama. The victim, Dularchand Yadav, was campaigning when violence erupted between two groups. Police are investigating the incident.
Web Summary : बिहार चुनाव प्रचार में हिंसा। मोकामा में झड़प के दौरान प्रशांत किशोर की जन सुराज्य पार्टी के एक समर्थक नेता की गोली मारकर हत्या कर दी गई। मृतक दुलारचंद यादव चुनाव प्रचार कर रहे थे जब दो गुटों में हिंसा भड़क गई। पुलिस मामले की जांच कर रही है।