Bihar Assembly Election 2025 :बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी नामांकनाची अंतिम मुदत जवळ आली असताना, महाआघाडीत अद्याप तिकीट वाटपावर एकमत झालेलं नाही. विशेषतः काँग्रेसच्या गोटात मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने सुरुवातीला मोहम्मद नौशाद यांना उमेदवारी घोषित केली होती. पण अखेरच्या क्षणी पक्षानं त्यांना नामांकन दाखल करण्यास थांबवलं आणि त्यांचं तिकीट रद्द करुन आरजेडीचे नेते ऋषि मिश्रा यांना उमेदवार म्हणून उतरवलं.
पीएम मोदींच्या आईबद्दल अपशब्द
मोहम्मद नौशाद यांचं नाव राहुल गांधींच्या "वोटर अधिकार यात्रा" दरम्यान चर्चेत आलं होतं. त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले गेले होते. नौशाद स्वतः त्या मंचावर उपस्थित नव्हते, तरीही भारतीय जनता पक्षाने या प्रकरणावरुन राज्यात मोठं वादळं उठवलं होतं. राज्यासह देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली होती.
या घटनेनंतर काँग्रेसमध्येच नौशाद यांना उमेदवारी द्यावी का, यावर तीव्र मतभेद आणि अंतर्गत तणाव सुरू झाला. शेवटी पक्षानं वाद टाळण्यासाठी त्यांचं तिकीट रद्द करून आरजेडीच्या गोटातील ऋषि मिश्रा यांना उमेदवार बनवलं.
काँग्रेस–RJD मधील रस्सीखेच
या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. शेवटी दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाने ऋषि मिश्रा यांचं नाव निश्चित करण्यात आलं. मिश्रा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहेत, तर भाजपने जिबेश कुमार मिश्रा यांना या मतदारसंघातून उमेदवार केलं आहे. म्हणजेच जालेमध्ये ‘मिश्रा विरुद्ध मिश्रा’ अशी थेट लढत होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
पहिला टप्पा मतदान: 6 नोव्हेंबर
दुसरा टप्पा मतदान: 11 नोव्हेंबर
मतमोजणी: 14 नोव्हेंबर
Web Summary : Bihar Congress candidate Mohammad Naushad's ticket revoked after controversy over remarks against PM Modi's mother. RJD's Rishi Mishra will now contest. 'Mishra vs. Mishra' fight in Jale.
Web Summary : पीएम मोदी की माँ पर टिप्पणी के बाद बिहार कांग्रेस उम्मीदवार मोहम्मद नौशाद का टिकट रद्द। अब आरजेडी के ऋषि मिश्रा चुनाव लड़ेंगे। जाले में 'मिश्रा बनाम मिश्रा' की लड़ाई।