शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 06:35 IST

Bihar Assembly Election 2025 News: बिहारमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. यात आयोग- भाजपची भागीदारी आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

अररिया - बिहारमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. यात आयोग- भाजपची भागीदारी आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

अररियामध्ये मतदार अधिकार यात्रेदरम्यान राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासमवेतच्या पत्रपरिषदेत ते म्हणाले की, मतदार यादी पुनरीक्षण म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. आम्ही निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतचोरी करू देणार नाहीत. निवडणूक आयोग भाजपला लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे.

इंडिया आघाडीतील पक्ष एकजूट होऊन काम करीत आहेत व याचे योग्य ते परिणाम दिसतील, असे त्यांनी म्हटले आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी लवकरच एक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. विरोधी आघाडीचे सर्व घटक पक्ष वैचारिक व राजकीय रूपाने एकजूट होऊन काम करीत आहेत व याचे योग्य परिणाम दिसतील, असे राहुल गांधी म्हणाले.

मिठी मारली, चुंबन घेतले राहुल गांधी दुचाकीवरून अररियाकडे रवाना झाल्यावर अज्ञात व्यक्तीने त्यांना मिठी मारली व त्यांच्या खांद्याचे चुंबन घेतले. याचवेळी राहुल गांधी आपली दुचाकी स्थिर ठेवत असताना त्या युवकाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थापड लगावून एका बाजूला ढकलले. सुरक्षेत चूक झाल्याबाबत विचारले असता, पोलिसांनी सांगितले की, याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. 

विवाहाबाबत चर्चा सुरूराहुल गांधी यांनी आपल्या विवाहाबाबत अनोख्या अंदाजात म्हटले आहे की, याबाबत चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यावर बोलताना तेजस्वी म्हणाले की, त्यांनी लवकरात लवकर विवाह करावा. त्यावर राहुल गांधी हे त्यांच्याकडून माइक घेऊन अनोख्या अंदाजात म्हणाले की, हा सल्ला मलाही लागू होतो. तेजस्वी यांच्या वडिलांशी याबाबत चर्चा सुरू आहे.

९८% मतदारांची कागदपत्रे प्राप्तबिहारमध्ये ९८.२ टक्के मतदारांची कागदपत्रे प्राप्त झाली आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा भाग म्हणून प्रकाशित झालेल्या बिहारच्या प्रारूप मतदार यादीवर दावे आणि आक्षेप दाखल करण्यासाठी आता फक्त आठ दिवस उरले आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

फक्त ‘आधार’ वैध पुरावा नाहीच : भाजपफक्त आधार क्रमांक हा मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी वैध पुरावा ठरतो, असे न्यायालयाने म्हटलेले नाही. बिहारमधील मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या यासंबंधी आदेशाचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप भाजपने विरोधकांवर केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी